दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी; विनाशुल्क भरता येणार अर्ज

IOCL Job 2024 | दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (indian oil corporation limited) अनेक शिकाऊ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. याची (IOCL Job 2024) अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनी जराही वेळ वाया न घालवता लगेच यासाठी अर्ज करावा. IOCL च्या शिकाऊ पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 2 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून तब्बल 400 पदे भरली जाणार आहेत. या 400 पदांमध्ये ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या जागा आहेत. यासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

कोण करू शकतो अर्ज?

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असायला हवे. तसेच, त्याच्याकडे संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा नियमित पूर्णवेळ ITI डिप्लोमा असावा.तसेच, उमेदवाराने संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रात 3 वर्षांचा नियमित डिप्लोमा केलेला असावा. उमेदवार हा 50 टक्के गुणांसह पदवी पूर्ण केलेला असावा. असे (IOCL Job 2024)उमेदवारच अर्ज करू शकतात.

निवड कशी होणार?

यासाठी 18 ते 24 वयोगटातील उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत. आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत असणार आहे. या भरतीसाठी प्रथम उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा होईल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी  बोलावले जाईल. यानंतर प्री-एंगेजमेंट मेडिकल फिटनेस चाचणी होईल.

महत्वाचे म्हणजे या पदासाठी अर्ज (IOCL Job 2024)करायला तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीये. इच्छुक उमेदवार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर अधिक माहिती प्राप्त करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे

News Title : IOCL Job 2024

महत्त्वाच्या बातम्या-

विजय कदम यांच प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत होतं मोठं कनेक्शन!

“अजित पवार कधीच जातीच्या राजकारणात पडले नाहीत”; राज ठाकरेंचं वक्तव्य

“माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील ते कळणारही..”; राज ठाकरेंचा इशारा

कमी बजेटमध्ये लाँच झाली ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत

राज ठाकरेंचा शरद पवार-उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप; म्हणाले..