Top News देश

राजधानीत बाहेरून आलेल्यांनी हिंसाचार केला- अरविंद केजरीवाल

Loading...

नवी दिल्ली | दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारामागे  बाहेरच्या लोकांचा हात असल्याचं, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. केजरीवाल दिल्लीच्या विधानसभेत बोलत होते.

दिल्लीच्या जनतेला हिंसा नको आहे. काही असामाजिक, राजकीय आणि बाहेरच्या लोकांद्वारे हिंसाचार घडवून आणण्यात आला आहे. एक सामान्य माणूस हे सर्व करु शकत नाही. दिल्लीतील हिंदू आणि मुस्लिमांना आपसांत भांडण नको आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

या हिंसाचारात शहीद झालेले दिल्लीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रतनलाल यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी घोषणाही यावेळी केजरीवाल यांनी केली.

दरम्यान, जर गरज असेल तर दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने लष्कराला पाचारण करायला हवे. दिल्लीची ओळख दंग्यांनी नव्हे तर चांगले शिक्षण आणि आरोग्यानेच शक्य आहे, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

 

Loading...

ट्रेडिंग बातम्या- 

बांगड्या घालण्याच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युतर

भाजपचे खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर??

महत्वाच्या बातम्या- 

दिल्ली शांत करण्याची जबाबदारी मोदी-शहांनी सोपवली ‘या’ व्यक्तीवर

सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला

तुकाराम मुंडेंची धडक कारवाई; कुख्यात गुंडाच्या आलिशान बंगल्यावर हातोडा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या