खुशखबर! iPhone झाला स्वस्त; मिळतेय 19 हजारांची सूट

iPhone 15 Plus l आपल्याकडे आयफोन असावा असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र कित्येक लोकांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण येत्या 9 सप्टेंबर रोजी iPhone 16 सीरीज लाँच होणार आहे. जर तुम्हीही iPhone 16 फोनची वाट पाहत असाल तर आता तुम्हाला प्रतीक्षा करायची नसणार आहे. अशातच कंपनीने ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने iPhone 15 Plus फोनवर देखील एक चांगली डील समोर आली आहे.

iPhone 15 Plus वर मिळतोय भरघोस डिस्काउंट :

कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर iPhone 15 Plus या फोनवर मोठी सूट दिली आहे. या फोनवर तुम्हाला तब्बल 19 हजार रुपयांना डिस्काउंट मिळत आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही बँक कार्ड किंवा जुना फोन एक्सचेंज करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही हा iPhone 15 Plus स्वस्तात खरेदी करू शकता.

Flipkart वर iPhone 15 Plus ची ओरिजनल किंमत सुमारे 89,600 रुपये आहे. पण या फोनवर 21 टक्के फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे, त्यानंतर तुम्ही हा फोन 69,999 रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्ही हा फोन 19,601 रुपयांना स्वस्तात खरेदी करू शकता. मात्र, ही सूट फक्त iPhone 15 Plus च्या पिवळ्या रंगाच्या व्हेरिएंटवर दिली जात आहे.

इतर व्हेरिएंटची किंमत किती? :

मात्र इतर बाकीचे कलर व्हेरिएंट तुम्ही 72,999 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्हाला iPhone 15 Plus च्या पिवळ्या रंगाच्या व्हेरिएंट खरेदी करण्यावर 53,350 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे. फोनच्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर ही सूट तुम्हाला दिली जात आहे.

आता या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या फोनमध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले पॅनल आहे. यासोबतच फोनमध्ये डायनॅमिक आयलँड आणि HDR डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 2000 च्या पीक ब्राइटनेसला देखील सपोर्ट करत आहे.

News Title : iPhone 15 Plus Discount

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली, गृह मंत्रालय फेल झालंय!

भाजपच्या 2 आमदारांमध्ये वादाचा भडका, भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा

एकनाथ शिंदेच्या मुलाला फायदा होण्यासाठी… भाजप आमदाराकडूनच शिंदेंना तडाखे

मी कधीच भाजपमध्ये जाणार नाही!; रवी राणांनी बावनकुळेंची ॲाफर धुडकावली

राज्यातील भाजप नेत्यांकडून एकनाथ खडसेंची अवहेलना, मोठा निर्णय घेणार!