iPhone 15 वर मिळतंय तब्बल 9 हजारांचं डिस्काउंट; जाणून घ्या ऑफरबद्दल

iPhone 15 | अॅपल कंपनीकडून प्रत्येक वर्षी नवीन आयफोन बाजारात आणले जातात. गेल्या वर्षी कंपनीनं iPhone 15 Series लाँच केली होती. यावर्षी कंपनीकडून iPhone 16 लाँच केला जाणार आहे. आयफोन 16 लाँच होण्यास अजून तरी काही वेळ आहे. पण, तुमच्यासाठी कंपनीने एक विशेष ऑफर आणली आहे. जी ऐकून (iPhone 15) तुमचा आनंद द्विगुणित होईल.

आयफोन 15 च्या किमतीमध्ये घट झाली आहे. ही आयफोन प्रेंमीसाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आयफोन खरेदी करण्याची इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. बऱ्याचदा बजेटमुळे या इच्छा मागे पडतात. मात्र, आता तुम्हाला परवडेल अशा किमतीमध्ये कंपनी आयफोन विकत आहे. यावर काही काळासाठी वशेष ऑफर ठेवण्यात आली आहे.

chroma वर विशेष ऑफर

तुम्हाला आयफोनवर 9 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. विविध बँक ऑफर्सचा लाभ घेत या डिस्काऊंटचा लाभ तुम्ही घेऊ शकता. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई कॉमर्स वेबसाईट क्रोमावर जावे लागेल. यावर तुम्हाला सवलतीच्या दरात आयफोन मिळू शकतो.

क्रोमामध्ये तुम्हाला आयफोन 15 हा मोबाईल 71 हजार 290 रुपयांना मिळतोय. याची मूळ किंमत 79900 रुपये आहे. म्हणजेच हा आयफोन तुम्हाला 8610 रुपयांनी कमी किमतीत मिळणार आहे. या संधीचा लगेच फायदा घ्या. यावर तुम्हाला तब्बल 10.78 टक्के सूट क्रोमावरुन आयफोन खरेदी केल्यास मिळणार (iPhone 15) आहे.

आयफोनवर 9 हजारांची सूट

याचबरोबर तुम्ही पहिल्यापासून आयफोन वापरत असाल तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील घेता येणार आहे. तुमच्याकडे आयफोन 14 , 128 GB या मॉडेलचा फोन असेल तर तुम्हाला क्रोमावर एक्स्चेंज मूल्य 26 हजार 610 रुपये मिळेल. मात्र, ही किंमत फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. फोन डॅमेज झालेला नसला पाहिजे. त्याची स्क्रीन, कॅमेरा, डेंट, क्रॅक्स सह इतर गोष्टींचा देखील एक्सचेंज करताना विचार केला जाईल. (iPhone 15)

News Title- iPhone 15 Special Offer on Chroma

महत्वाच्या बातम्या-

वाहतूक पोलिसांचं प्रसंगावधान अन् महिलेचा वाचला जीव; पाहा अटल सेतूवरचा थरारक Video

देशात रेल्वे अपघाताचं सत्र सुरूच, साबरमती एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरले अन्…

तब्बल 1 महिन्यांनी इंधनदरात घसरण?; जाणून घ्या आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

कुंभ, मकर, मीनसह ‘या’ राशीवर राहील शनीदेवाची कृपा, भाग्य उजळणार!

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी?; मुख्य निवडणूक आयुक्तांनी अखेर सांगितलं