कोरोना खेळ

अखेर ठरलं! ‘या’ देशात होणार आयपीएलचा 13वा सीजन

नवी दिल्ली | टी-20 वर्ल्डकप आयसीसीने पुढे ढकलल्यानंतर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला होता. क्रिकेटच्या चाहत्यांना आयपीएलचा 13 सीजन नेमका कुठे होणार आहे हा प्रश्न पडला होता. मात्र या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून आयपीएलचा तेरावा सीजन युएईमध्ये खेळवला जाणार आहे.

आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ESPNCricinfo शी बोलत असताना याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊंसिलच्या येत्या बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असंही पटेल म्हणाले. स्पर्धेच्या तारखांबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नसली तरीही मिळालेल्या वृत्तानुसार 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर या काळात बीसीसीआय तेराव्या सीजनचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे.

ब्रिजेश पटेल यांच्या सांगण्यानुसार, “आयसीसी टी-20 वर्ल्डकपचं आयोजन पुढे ढकललं जाईल याची वाट आम्ही पाहत होतो. आयसीसीने याबद्दलची घोषणा केल्यानंतर आम्ही भारत सरकारकडे परवानगी मागितलीये. आम्हाला परवानगी मिळेल अशी आशा आहे. दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन मैदानांवर ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेला चाहत्यांना परवानगी असेल की नाही हा निर्णय UAE मधील सरकारचा असेल.”

ठरलेल्या वेळापत्रकानुसार २९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या सीजनचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र देशातली करोनाची परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. यानंतरही परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे अखेरीस ही स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली. पण स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार होतं. ते टाळण्यासाठी वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता यावं यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न सुरु होते.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज 8369 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

कोरोनावर मात करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू कमी करण्यासाठी एकमात्र उपाय म्हणजे… – देवेंद्र फडणवीस

“दोन श्वासांमधील अंतर संपल्यावर प्रयत्न करुन काहीच अर्थ नाही”

पुन्हा सत्तेत आल्यास गरीबांना आयुष्यभर मोफत धान्य देणार- ममता बॅनर्जी

“देशात अमर, अकबर, अँथनी एकत्र राहू नयेत असं भाजपला स्थापनेपासूनच वाटत आलंय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या