खेळ

हम तो डुबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे! अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईची कोलकातावर मात

मुंबई | चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समधील सामन्यात चेन्नईने विजय मिळवला. त्यामुळे कोलकाताच्या उरसूर आशेवर पाणी फेरलं. चेन्नईचा संघ प्लेऑफच्या फेरीतून बाहेर पडला आहे. मात्र कोलकाताने विजय मिळवला असता तर त्यांनीही प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी होती.

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सर रविंद्र जडेजाने गगनचुंबी षटकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केलं. एकवेळ 12 चेंडूत 30 धावांची गरज चेन्नईला होती. मात्र जडेजा आणि सॅम करन यांनी जारदार फटकेबाजी करत विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता संघाने 173 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. यामध्ये सलामीला उतरलेल्या नितीश राणाने अर्धशतक ठोकत 87 धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिकने 10 चेंडूत 21 धावा केल्या.

दरम्यान, चेन्नईची सुरूवात खराब झाली. वॉटसन लवकर बाद झाला त्यानंतर सलामीवीर गायकवाड आणि अंबाती रायडूने चांगली भागिदीरी केली. यामध्ये गायकवाडने 72 धावा ठोकल्या तर रायडूने जलद फलंदाजी करत 20 चेंडूत 38 धावा केल्या.

 

महत्वाच्या बातम्या-

“महविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही केंद्राला विचारलं होतं का?”

“…तरी देखील मी माझ्या मुलाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागते”

“अतिवृष्टीच्या मदतीमध्ये वाढ करावी, अन्यथा सरकारला हादरवणारे आंदोलन करु”

“सुनील तटकरेंना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल”

“त्यांना वाटलं की संधी आली अशोक चव्हाणला ठोका, पण…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या