Top News खेळ

आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर होणार!

नवी दिल्ली | जगभरात सर्वत्र कोरोनाने थैमान माजवलं आहे. याचा फटका क्रिकेटलाही बसलाय. कोरोनामुळे इंडियन प्रिमीयर लीग म्हणजेच आयपीएल स्थगित केली होती. आयपीलची स्पर्धा रद्द करण्याबाबतही चर्चा सुरु होती मात्र आयपीएल रद्द केल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. यासाठी वर्षाअखेरीस या स्पर्धेचं आयोजन करण्याची तयारी बीसीसीआयने केलीये. मात्र आयपीएलचा 13वा हंगाम भारताबाहेर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जागांबद्दल अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, पण यंदाचा हंगाम हा भारताबाहेर आयोजित केला जाईल. सध्या दुबई आणि श्रीलंका यांच्यात आयोजनाचा विचार सुरु आहे. त्यामुळे फक्त साखळी सामने परदेशात भरवून मग परिस्थितीचा अंदाज घेऊन स्पर्धा भारतात हलण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. मात्र कोरोनामुळे आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत नाहीयेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलचे संकेतही दिले आहेत. पण अजूनही आयसीसीने अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही

टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनानंतर बीसीसीआयला आयपीएलबाबत ठोस निर्णय घेता येणारे. श्रीलंका आणि दुबई क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएलचा तेरावा हंगाम आपल्या देशात भरवण्याचा प्रस्ताव दिला होता. याआधीही 2009 आणि 2014 साली आयपीएलचे सामने अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि दुबईमध्ये भरवण्यात आले होते.

ट्रेंडिंग बातम्या-

“गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना आजही धोका आहे”

महाराष्ट्रात आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याच्या अंदाज

शेतकऱ्यांसाठी सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा, जुलैअखेरपर्यंत….

लॉकडाऊनमुळे पुण्यातील इस्टेट एजंट बनला सोनसाखळी चोर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या