बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL 2021: भरतनं शेवटच्या बाॅलवर सिक्स मारताच कोहलीचा ‘विराट’ जल्लोष, पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या आयपीएलचं 14वं पर्व सुरु असून या पर्वात अनेक रोमांचक सामने पहायला मिळाले. अशातच आता हे पर्व एका रोमांचक वळणावर येऊन ठेपलं आहे. यंदाची ट्राॅफी कोणाच्या खात्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. अशातच काल झालेल्या रंगतदार सामन्यात आरसीबीच्या केएस भरतनं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत बंगळुरूला हा विजय मिळवून दिला.

कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सनं रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. दिल्लीनं बंगळुरूला विजयासाठी 165 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बंगळुरूनं 7 गडी राखून पूर्ण केलं. शेवटच्या बाॅलपर्यंत गेलेल्या या सामन्यात आरसीबीचा फलंदाज केएस भरतनं संघाला शेवटच्या बाॅलवर 5 धावांची गरज असताना षटकार ठोकत विजय मिळवून दिला.

या सामन्यात भरतनं 52 बॉलमध्ये 78 रनची खेळी केली. भरतनं आवेश खानच्या शेवटच्या बॉलवर सिक्स लगावताच विराटनं जागेवरच उडी मारली. लगेच टीममधील सहकाऱ्यांनी गळाभेट घेऊन आनंद साजरा केला. विराटच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, या व्हिडीओनं सध्या सगळ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडू असून गोलंदाजांच्या यादीत पहिले पाच भारतीय खेळाडूच आहेत.

थोडक्यात बातम्या – 

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

ड्रग्ज प्रकरणात बाॅलिवूडमधून आणखी एक मोठं नाव आलं समोर!

“मुख्यमंत्र्याना भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात हे तरी माहितीये का?”

पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघात, भरधाव कारने चिमुकल्याला चिरडलं

मुंबईकर महिलांसाठी आज विशेष लसीकरण, नोंदणी न करता मिळणार दोन्ही डोस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More