बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL 2021- …म्हणून हार्दिक पांड्याने पहिल्या सामन्यात बॉलिंग केली नाही

चेन्नई | आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने पराभव केला. मुंबईने ठेवलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग बंगळूरुने शेवटच्या बॉलपर्यंत केला. या सामन्यात मुंबईला सहाव्या बॉलरची कमी जाणवली. मुंबईचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने या सामन्यात बॉलिंग का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर मुंबईचा ओपनर क्रिस लीन याने दिलं आहे.

आम्हाला सहाव्या बॉलरची कमी जाणवली. हार्दिकने बॉलिंग का केली नाही, हे मला नक्की माहिती नाही. पण बहुतेक त्याचा खांदा दुखत होता. तसंच हा हार्दिकच्या वर्क लोड मॅनेजमेंटचा भाग आहे. हार्दिक बॉलिंग टाकतो तेव्हा टीम निश्चितच संतुलित होते, असं लीन म्हणाला.

रोहित शर्माला रन आऊट केल्यानंतर मी थोडा नरवस होतो, अशी प्रतिक्रिया लीनने दिली. मुंबईचे विकेट कीपिंग सल्लागार किरण मोरे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईच्या टीमने दोन दिवस सराव केला नव्हता. जर एखाद्या फास्ट बॉलरला तुम्ही दोन दिवस खोलीत बंद केलं तर वेगळीच परिस्थिती तयार होते पण आम्ही कारणं देऊ शकत नाही, असं वक्तव्य लीनने केलं.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने लागोपाठ 9 वेळा आयपीएलचा आपला पहिला सामना गमावला आहे. या कामगिरीमुळे आपण निराश झालो नाही, कारण चॅम्पियनशीप जिंकणं महत्त्वाचं आहे. मॅच चांगली झाली, आम्ही त्यांना सहज जिंकू दिलं नाही, पण आम्ही केलेल्या स्कोअरनंतर खूश नव्हतो. आम्हाला 20 रन कमी पडले, असं कर्णधार रोहित शर्माने सांगितलं.

थोडक्यात बातम्या –

मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज; उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘लोक पोलिसांना चोपून काढतील अन् मारामारी झाली तर…’; उदयनराजे भोसले आक्रमक

कार चालकाने अचानक दरवाजा उघडला, दुचाकीस्वार रस्त्यावर आडवा, भरधाव बसने चिरडलं

…अन् खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कटोरा घेऊन बसले रस्त्यावर

धक्कादायक! जिवंत रुग्णाचा दिला मृत्यू दाखला; निष्काळजीपणाचा कळस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More