बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL 2021: पराभवानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडीओ

मुंबई | सध्या आयपीएल एका रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. यंदाची ट्राॅफी कोणाच्या खात्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. अशातच काल झालेल्या सामन्यात कोलकातानं बंगळुरुवर 4 विकेट्सनं विजय मिळवला. या सामन्यानं विराट कोहलीचा आयपीएल कर्णधारपदाचा शेवट झाला. आपल्या नेतृत्वात आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्याचं विराट कोहलीचं स्वप्न भंगलं. या पराभवानंतर विराट कोहलीला रडू कोसळल्याचं पहायला मिळालं.

कोलकाता विरुद्ध झालेल्या या सामन्यानंतर विराट खूपच भावूक झाल्याचं पहायला मिळालं. इतक्या वर्ष आरसीबीचं कर्णधार पद सांभाळल्यानंतर काल त्या कर्णधार पदाचा शेवट झाला. त्यामुळे सामना संपल्यानंतर विराटच्या डोळ्यात पाणी तरळ्याचं पहायला मिळालं. विराटच्या डोळ्यांत पाणी पाहून त्याचे चाहत्यांनी अश्रू अनावर झाले.

सध्या सोशल मीडियावर विराटचे खूप सारे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये विराटला रडू कोसळल्याचं दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विराटसेनेकडून दुःख व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, विराट कोहली 7 वर्षांपासून आरसीबीचा कर्णधार आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेलं नाही. जाता जाताही ट्रॉफी जिंकण्याचं विराटचं स्वप्न भंगलं आहे. मात्र विराटनं आपण आयपीएलमध्ये आरसीबीकडूनच खेळत राहू आणि याच टीममधून खेळताना निवृत्त होऊ, असं सांगितलं होतं.

 

 

थोडक्यात बातम्या – 

वानखेडे आणि कंबोज यांची भेट तर…; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत?; व्हिडीओ पुराव्यासहीत वानखेडेंची तक्रार

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी WHOचा महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

आमदार रवी राणांच्या अडचणी वाढल्या; आमदारकी धोक्यात?

‘मुंबई क्रुझ प्रकरण पुर्णपणे खोटं, शाहरूख खान त्यांच्या निशाण्यावर’; शत्रुघ्न सिन्हा संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More