IPL 2022| कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीने सर्वांची चिंता वाढली असताना आता आयपीएलच्या (IPL 2022) मैदानात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या 6 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. एकिकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना आयपीएलमधील खेळाडूंनाही कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाचा धोका पाहता बीसीसीआयने (BCCI) आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
22 एप्रिल रोजी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याची जागा बीसीसीआयकडून बदलण्यात आली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनूसार दिल्ली विरूद्ध राजस्थान सामना आता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. 22 एप्रिल रोजीचा हा सामना यापूर्वी पुण्यात होणार होता. मात्र, आता बीसीसीआयने या सामन्याच्या जागेत बदल केला आहे.
दरम्यान, बुधवारी दिल्ली कॅपिटल्स संघामधील तब्बल 6 खेळाडूंच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दिल्लीच्या संघातील खेळाडू एकापाठोपाठ एक पॉझिटीव्ह येत असल्याने बीसीसीआय अलर्ट मोडवर गेलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘त्या’ जाहिरातीवरून अक्षय कुमारने मागितली चाहत्यांची माफी, म्हणाला…
‘पैसे द्या नाहीतर…’, धनंजय मुंडेंना महिलेने दिली धमकी
राज्यातील कोरोना स्थितीबाबत राजेश टोपेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
‘त्या’ बैठकीला राज ठाकरेही हजेरी लावणार?, गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले…
Comments are closed.