ipl 2022: हार्दिकची गुजरात टीम राहुलच्या लखनौवर भारी, रंजक सामन्यात गुजरातचा दणदणीत विजय
मुंबई | गुजरात (Gujrat Titans) विरूद्ध लखनौ (Lucknow Super Giants) सामन्यात शेवटचं षटक निर्णायक ठरलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सने बाजी मारली. के एल राहुलच्या (K L Rahul) लखनौ सुपर जायंट्सने 159 धावांचं आव्हान गुजरातपुढे ठेवलं होतं. मात्र, गुजरात टायटन्सने पाच गडी राखत पहिली मॅच खिशात घातली. (ipl 2022)
अष्टपैलू खेळाडू दीपक हुडा आणि आयुष बेदोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौच्या टीमने 159 धावा काढल्या. 159 धावांचं लक्ष्य गाठताना गुजरातची सुरूवात खराब झाली. 15 वर 2 बाद चित्र पाहायला मिळत असताना गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने 28 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार लगावत 33 धावांची खेळी केली.
हार्दिक पंड्याच्या खेळीने गुजरातला दिलासा मिळत असतानाच हार्दिक बाद झाला. हार्दिक बाद झाल्यानंतर राहुल तेवतियाने गुजरातकडून खिंड लढवली. राहुलने 24 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 40 धावा केल्या.
दरम्यान, राहुल तेवतियाच्या विस्फोटक खेळीने गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 15व्या सिझनमधील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय झाला तर लखनौ सुपर जायंट्सची सुरूवात मात्र निराशाजनक झाली आहे.
थोडक्यात बातम्या –
धमाका होणार! ‘KGF Chapter2’ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
“आमदारांना घरे देऊ नयेत”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय राडा; भाजपच्या पाच आमदारांचं निलंबन
“आम्ही राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसवर प्रचंड नाराज आहोत”
रात्री झोपताना ही गोष्ट करत असाल तर आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध
Comments are closed.