बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL 2022 ! किंग कोहली पुन्हा कर्णधार होणार?; आरसीबीने स्पष्टच सांगितलं…

मुंबई | आयपीएल 2022 चा मेगा लिलाव 12 आणि 13 फ्रेब्रुवारीला होणार आहे. गेल्या वर्षी विराटनं आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे विराटनंतर आरसीबीचे कर्णधारपद कोण स्वीकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच पुन्हा एकदा किंग कोहली आरसीबीचं कर्णधार पद स्विकारणार असल्याचं समजतंय.

आरसीबीच्या कर्णधार पदासाठी श्रेयस अय्यर किंवा ग्लेन मॅक्सवेल या दोन नावांची चर्चा सुरु असलेली पहायला मिळत होती. मात्र विराट कोहली पुन्हां एकदा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद स्विकारताऩा दिसू शकतो. आगामी हंगामात विराट संघाचे नेतृत्व करु शकतो, असं आरसीबीच्या अध्यंक्षानी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्याचं पहायला मिळतय.

विराट कोहली कर्णधारपदासाठी सहमत असेल तर तो आरसीबीचा कर्णधार असेल. विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे. आम्ही त्याला कर्णधारपदी ठेवण्यास प्राधान्य देऊ शकतो. आम्ही त्याला कर्णधारपद परत घेण्यासाठी विनंती करु. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक सामने जिंकले आहेत, असं आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा यांनी म्हटलं.

दरम्यान, विराट कोहलीनं 2013 मध्ये आरसीबीचे कर्णधारपद स्विकारले होते. कोहलीने 8 हंगामात आरसीबीचे नेतृत्व केले. मात्र तो संघाला एकदाही ट्राफी मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे त्यानं कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला.

थोडक्यात बातम्या – 

“मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, तुमच्यात हिंमत असेल तर…”

अब्दुल सत्तारांनी पुन्हा छेडला ‘सेना-भाजप युती’चा राग, म्हणाले..

‘म्युझिकल थेरेपी’! व्यायाम करुन घेण्यासाठी नर्सनं लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

पुष्पाची क्रेझ संपता संपेना! आता ब्रावोनं केला भर मैदानात ‘पुष्पा’वर हटके डान्स, पाहा व्हिडीओ

Whasapp New Feature: व्हाॅट्सअॅपचं ‘हे’ नवं फीचर लवकरच होणार लाॅंच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More