CSK चं टेंशन वाढवणारी बातमी समोर!

IPL 2024 | आयपीएल 2024 (IPL 2024) हंगाम सुरू आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये नवीन ट्वीस्ट निर्माण होताना दिसतोय. नुकतीच चेन्नई सुपरकिंग्जच्या डोकेदुखीत वाढ होणारी बातमी समोर आली आहे. यामुळे ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आगामी सामना खेळणार नाही. तो उर्वरित हंगामातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. (IPL 2024)

मुस्तफिजूर रहमान चेन्नईतून खेळणार नाही?

मुस्तफिजूर रहमान हा पर्पल कॅपचा मानकरी असलेला गोलंदाज आहे. तो सध्या आपल्या मायदेशी बांगलादेशला परतला आहे. व्हिसासंबंधीत अडचणीमुळे तो आपल्या मायदेशी गेला असल्याचं कारण समोर आलं आहे. 5 एप्रिलला सनरायजर्स हैदराबादविरोधात तो खेळताना दिसणार नाही. (IPL 2024)

युएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी त्याला व्हिसाची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात अडचणी असून त्यासाठी तो बांगलादेशला परतला आहे, अशी माहिती आहे.

टी 20 वर्ल्डकपचे यजमानपद वेस्ट इंडिजसह अमेरिकेकडं आहे. मुस्ताफिजूर त्याच्या अमेरिकन व्हिसासाठी बायोमेट्रिक्स प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो बांगलादेशला गेला आहे. बायोमेट्रिक्स प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा भारतामध्ये येता येणार नाही. कारण पासपोर्ट परत देण्यासाठी एक वेटिंग पीरियड द्यावा लागेल. यावेळी त्याला बांगलादेशमध्ये रहावं लागेल. यामुळे तो चेन्नईकडून एकाहून जास्त महिने खेळू शकणार नाही.

तर मुस्तफिजूर खेळू शकणार नाही

बायोमेट्रिक्ससाठी 4 एप्रिल रोजी अपॉइंटमेंट शेड्युल करण्यात आली. चेन्नईचा पुढचा सामना हा 5 एप्रिल रोजी हैदराबाद येथे होणार आहे. त्या सामन्यासाठी मुस्तफिजूर रहमान खेळू शकणार नाही. चेन्नईचा सामना 8 एप्रिलला असून रहमानला उशीर झाल्यास तो खेळू शकणार नाही.

News Title – IPL 2024 In CSK Bowler Mustafizur Rahman Will Not Play In Ipl

महत्त्वाच्या बातम्या

नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!

“भाजपने एकनाथ शिंदेंना ताटाखालचं मांजर बनवलंय”

तिसरं लग्न करुनही शोएब मलिकचं मन भरेना, नवा कारनामा समोर आल्याने खळबळ!

‘नक्की काय घडलंय हे सांगायचंय’; ‘त्या’ पोस्टरमुळे चर्चांना उधाण

अक्षय तृतीया कधी आहे? जाणून घ्या पूजेची तारीख, वेळ आणि शुभ योग