नवव्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने तोंड उघडलं, सगळं खरं खरं सांगून टाकलं

IPL 2024

IPL 2024 | आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे अनेकांचं आयपीएलच्या सामन्यांकडे लक्ष आहे. क्रिकेटचे अनेक चाहते सामन्यांचा मनमुरादपणे आनंद लुटताना दिसत आहेत. अनेकांचं लक्ष हे मुंबई इंडियन्स संघाकडे लागलं होतं. मात्र यंदाच्या आय़पीएल (IPL 2024) हंगामात मुंबई इंडियन्स संघामध्ये अनेक वादविवाद, अनेकदा मतभेत झालेले पाहायला मिळाले होते. कोलकाताने मुंबई इंडियन्स संघाला दोनवेळा पराभूत केलं आणि कोलकाता प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा संघ म्हणून दावेदार झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याला विचारलेल्या प्रश्नावर त्याने सर्वच खरं खरं सांगून टाकलं आहे. (IPL 2024)

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

“पराभव पचवणं खूपच कठिण आहे. सुरूवात आम्ही चांगली केली होती. मात्र चांगल्या सुरूवातीचं रूपांतर आम्हाला विजयात करता आलं नाही. खेळपट्टी एकसारखी नव्हती. कदाचित त्यामुळे त्याचा परिणाम हा खेळावर झाला असावा. त्यामुळे आम्हाला धावा रोखता आल्या नाहीत. खरं तर ते रोखणं गरजेचं होतं. गोलंदाजी करत असताना चेंडू ओला होता. मात्र तरीही गोलंदाजी करत असताना गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली”, असं हार्दिक पांड्या म्हणाला आहे. (IPL 2024)

पुढच्या सामन्याबाबत पांड्याला रणनितीबाबत विचारलं असता ते म्हणाले की, पुढच्या सामन्यात काहीही रणनिती नाही. केवळ पुढचा सामना खेळून आनंद घ्यायचा आहे. चांगलं क्रिकेट खेळायचं हे माझं पहिल्यापासूनचं ध्येय आहे. या पर्वात आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही असं मला वाटतं”, असं हार्दिक पांड्या म्हणाला. (IPL 2024)

मुंबई इंडियन्सला जिंकण्यासाठी कोलकाताने 158 धावा टार्गेट दिलं होतं. मात्र मुंबई इंडियन्स 8 गडी बाद 139 धावा करू शकला. यामुळे मुंबई इंडियन्स संघाचा 18 धावांनी पराभव केला.

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ

मुंबई इंडियन्स संघ इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

कोलकाता नाइट रायडर्स संघ-  फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

News Title – IPL 2024 Mumbai Indians Vs Kolkata Knight Riders Match in Mumbai Indians lost Match After Pandya Statement

महत्त्वाच्या बातम्या

वेळेवर नाश्ता दिला नाही म्हणून नवऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल!

बीडच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांच्या सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

“भाजपने तिला भुंकण्यासाठी पाठवलं”, इम्तियाज जलील यांचा नवनीत राणांवर पलटवार

‘अमित शहा यांना पंतप्रधान बनवलं जाईल’; ‘या’ बड्या नेत्याची भविष्यवाणी

…तेव्हा फक्त तयारी ठेवा!, सगळ्यांना दम भरणाऱ्या अजित पवारांना अमोल कोल्हेंनी भरला दम

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .