रोहित शर्मा आयपीएल खेळणार का?; मुंबई इंडियन्सने दिली मोठी अपडेट

IPL 2024 | मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आयपीएल (IPL 2024) सुरू होण्याआधीच अधिक चर्चेत राहिला आहे. त्याचं कर्णधारपद काढून घेतल्यानं चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर हार्दिक पांड्याला कर्णधारपद देण्यात आलं आहे. मात्र आता आयपीएलचे (IPL 2024) सर्व संघाचे खेळाडू खेळताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सचे देखील सर्व खेळाडू सराव करत असून रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव खेळताना दिसत नाही. यामुळे रोहित शर्मा यंदाची आयपीएल खेळणार नसल्याच्या चर्चा आहेत.

सोशल मीडियावर रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा अधिक चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून सध्या त्या व्हिडीओची चर्चा आहे.

काय आहे व्हिडीओ?

या व्हिडीओमध्ये दोन मुलं रोहित शर्माच्या आगमनाबाबत बोलत आहेत. मुंबईमध्ये बोलल्या जाणाऱ्या हिंदीमध्ये हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. रोहित शर्मा देखील मैदानामध्ये अशाच भाषेमध्ये बोलताना दिसतो. “वो आ रहा है..कौन..अरे वो जो गार्डनमें घुमने नहीं देता.पर मै तो घुमेगा..अरे भाई ज्यादा हिरो मत बन..अरे वो आ रहा है..हा..पूल शॉट का मास्टर..मुंबई का राजा..अरे मेरे को क्या दिखा रहा है, उसको दिखा..”, असं त्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे.

मागील काही दोन महिन्यांपासून रोहित शर्मा क्रिकेट खेळत आहे. त्याआधी विश्वचषक खेळला होता. त्यानंतर इंग्लंडविरोधात कसोटी सामने खेळण्यात आले. तर आता आयपीएल (IPL 2024) खेळण्यासाठी रोहित शर्मा सज्ज झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून त्याला कसलाही आराम नसल्याने त्याला आरामासाठी मॅनेजमेंटने वेळ दिला होता. (IPL 2024)

पहिला सामना गुजरात टायटन्सविरोधात

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा गुजरात टायटन्स विरोधात असणार आहे. संघाच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्या सांभाळणार आहे. तर गुजरातच्या कर्णधारपदाची धुरा ही शुभमन गिल सांभाळणार आहे. हा सामना 24 मार्च रोजी असणार आहे.

मुंबई इंडियन्स संघ

रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, देवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, रोमॅरियो शेफर्ड, शम्स शेफर्ड. नेहल वढेरा, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी.

News Title – IPL 2024 Rohit Sharma Mumbai Indians News Update

महत्त्वाच्या बातम्या

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ‘इतक्या’ जागा मिळणार?

‘आमचा निर्णय झालाय’; काँग्रेसचा ठाकरे गटाला इशारा

“भावाच्या विरोधात सख्ख्या भावाला उभं करणं हा एक अत्यंत…”

महायुतीत मनसेची एंट्री?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकारणात खळबळ

“आमच्याकडे ईडी, सीबीआयसह सत्ता आली तर…”; राऊतांचा भाजपला इशारा