SRH vs RR l आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना आज सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात होणार आहे. गुणतालिकेत SRH दुसऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे क्वालिफायर 1 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्धचा पराभव होऊनही त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची दुसरी संधी मिळाली आहे.
SRH vs RR l खेळपट्टी कशी असेल? :
दुसरीकडे, राजस्थानने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करून दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात स्थान पक्के केले आहे. आता SRH विरुद्ध RR सामन्यातील विजेता 26 मे रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर कोलकातासोबत अंतिम सामना खेळणार आहे.
हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी सर्वसाधारणपणे फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि आयपीएल 2024 मध्ये या मैदानावर अनेकदा 200 हून अधिक धावा केल्या गेल्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडेही इन-फॉर्म फलंदाज आहेत, त्यामुळे दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता आहे.
SRH विरुद्ध RR हेड टू हेड :
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही संघ आतापर्यंत 19 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी SRH 10 वेळा जिंकले आहेत आणि 9 वेळा आरआर जिंकले आहेत. हैदराबाद आणि राजस्थान आयपीएल 2024 मध्ये फक्त एकदाच आमनेसामने आले होते, ज्यामध्ये SRH ने प्रथम खेळताना 201 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ 200 धावा करता आल्या आणि सामना एका धावेने गमावला आहे .
तसेच या सामन्यावर पावसाचे संकट असणार आहे. जर पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास सुपर ओव्हर घेण्यात येणार आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, पावसामुळे क्वालिफायर सामना रद्द झाल्यास सुपर ओव्हर घेण्यात येते. मात्र याला वाव नसेल तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला पुढे जाण्याची संधी मिळते. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.
News Title – IPL 2024 SRH vs RR Qualifier 2
महत्त्वाच्या बातम्या
या राशीच्या व्यक्तींचा आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता
‘फिर से दिखा दुंगा सडक पे खेल’; माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप
चक्रीवादळ धडकणार?; हवामान विभागानं दिली महत्त्वाची अपडेट
पुणे अपघातानंतर पुणे महानगरपालिका अॅक्शन मोडवर!
“त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत”