IPL 2025: 10 संघांचे ‘सेनापती’ सज्ज! 5 युवा खेळाडूंवर मोठी जबाबदारी!

IPL 2025

IPL 2025 l इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2025) 18व्या हंगामाचा बिगुल वाजला असून, सर्व 10 संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये 5 नव्या कर्णधारांची निवड झाली असून, यामुळे स्पर्धेचा रोमांच अधिक वाढणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच इतर संघांनीही आपल्या कर्णधारांची अधिकृत घोषणा केली आहे.

नव्या नेतृत्वाखालील संघ :

आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. दिल्लीने अक्षर पटेलवर विश्वास टाकला आहे, लखनौने ऋषभ पंतला संधी दिली आहे, तर पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. याशिवाय आरसीबीने रजत पाटीदारला, तर केकेआरने अनुभवी अजिंक्य रहाणेवर जबाबदारी सोपवली आहे.

IPL 2025: सर्व 10 संघांचे कर्णधार :

दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल
सनरायझर्स हैदराबाद – पैट कमिन्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू – रजत पाटीदार
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर
लखनौ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
गुजरात टायटन्स – शुभमन गिल
चेन्नई सुपर किंग्स – ऋतुराज गायकवाड

IPL 2025 l 22 मार्चपासून IPL 2025 ला सुरुवात :

आयपीएलच्या 18व्या हंगामाची सुरुवात 22 मार्च 2025 पासून होणार असून, यावेळी स्पर्धेतील सर्व सामने 13 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू यांच्यात रंगणार आहे. हा सामना 22 मार्च रोजी रात्री 7:30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक 7 वाजता होणार आहे.

आयपीएल 2025 ची ओपनिंग सेरेमनी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर पार पडणार आहे. या भव्य सोहळ्यात बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आणि सेलिब्रिटी आपल्या दमदार परफॉर्मन्सने रंगत वाढवणार आहेत. मात्र, कोणते कलाकार या सोहळ्यात सहभागी होणार, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा भव्य सोहळा 22 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे.

News Title: IPL 2025: List of All 10 Captains

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .