धोनीसाठी कायपण! CSK ला लवकरच मिळणार खुशखबर?

MS Dhoni

MS Dhoni l बीसीसीआय आगामी आयपीएल संदर्भात एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयने नुकतीच IPL लीगच्या फ्रँचायझी मालकांची बैठक घेतली होती. यावेळी इम्पॅक्ट प्लेअर, मेगा ऑक्शन व रिटेन्शन पॉलिसीबाबत चर्चा झाली. यावेळी चेन्नई सुपर किंग्जने बीसीसीआयकडे बैठकीत नियम बदलण्याची मागणी केली होती, जेणेकरून ते धोनीला येत्या हंगामात देखील कायम ठेवू शकतील. BCCI 5 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या प्लेयर्सना ‘अनकॅप्ड’ खेळाडूंच्या श्रेणीतून खेळण्याची परवानगी देणारा नियम मंजूर करण्याची शक्यता आहे.

नियम काय आहे आणि तो कधी जाहीर होणार? :

आयपीएलच्या पहिल्या सत्रात एक नियम आणण्यात आला होता. या अंतर्गत, कोणतीही फ्रेंचायझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत कमी पैशात खरेदी करू शकते. त्यासाठी अट एवढीच होती की त्यांच्या निवृत्तीला ५ वर्षे झाली होती. बसिस ने हा नियम 2021 मध्ये काढून टाकला होता. कारण तो कधीही वापरला गेला नाही. मात्र आता 31 जुलै रोजी झालेल्या बैठकीत चेन्नईने आपला सर्वात महत्त्वाचा खेळाडू धोनीला खेळवण्यासाठी हा नियम परत आणण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा नियम परत येईल अशी सर्व क्रिकेटप्रेमींना अपेक्षा आहे.

धोनीने नुकतेच आयपीएल 2025 मध्ये खेळण्याबाबत वक्तव्य केले होते. मात्र आता नवीन रिटेन्शन नियमांवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत असे तो म्हणाला होता. सध्या मेगा लिलावापूर्वी केवळ 4 खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम आहे. पण आता अनकॅप्ड कॅटेगरी आणि रिटेन्शनच्या नियमांमध्ये बदल झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.

MS Dhoni l IPL 2025 मध्ये रिटेन्शन पॉलिसी काय असेल? :

BCCI ने हा नियम लागू केला तर त्याचा सर्वात जास्त फायदा हा चेन्नईच्या संघाला होणार आहे. तसेच जर हा नियम लागू झाला तर चेन्नई सुपर किंग्ज महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवतील. यापूर्वी हा नियम सर्वात पहिल्यांदा 2008 ते 2021 दरम्यान लागू होता, नंतर काही कारणास्तव हा नियम रद्द करण्यात आला होता. मात्र महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2025 मध्ये खेळण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

काही आयपीएल संघांना मेगा लिलाव काढायचा आहे. मात्र, याबाबत चर्चा सुरू आहे. याशिवाय, बोर्ड मेगा लिलावापूर्वी संघांना जास्तीत जास्त सहा खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते. याशिवाय राईट टू मॅच कार्ड नियम देखील मागे घेतला जाऊ शकतो.

News Title- IPL 2025 Player Retention Rule

महत्वाच्या बातम्या-

SBI ने करोडो ग्राहकांना दिला झटका, आता तुमचा EMI वाढणार?

iPhone 15 वर मिळतंय तब्बल 9 हजारांचं डिस्काउंट; जाणून घ्या ऑफरबद्दल

विधानसभेपूर्वीच मोदींचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; ‘या’ 3 मोठ्या प्रकल्पांना मंजूरी

वाहतूक पोलिसांचं प्रसंगावधान अन् महिलेचा वाचला जीव; पाहा अटल सेतूवरचा थरारक Video

देशात रेल्वे अपघाताचं सत्र सुरूच, साबरमती एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरले अन्…

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .