आयपीएल 2025 स्थगित! उर्वरित 16 सामने केव्हा होणार? BCCI कडून मोठी अपडेट

IPL 2025 Suspended

IPL 2025 Suspended | भारत-पाकिस्तान (Ind Vs Pak) दरम्यान सुरू असलेल्या वाढत्या तणावामुळे आयपीएलचा 18 वा मोसम काही काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. IPL 2025 चे उर्वरित 16 सामने पुढील आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले असून, याबाबत बीसीसीआयने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. (IPL 2025 Suspended)

आयपीएल स्थगितीमागील कारण काय? :

गेल्या दोन दिवसांत भारत-पाकिस्तानमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमुळे देशात तणाव निर्माण झाला आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव IPL स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 8 मे रोजी झालेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना लाईट फेल्युअरमुळे रद्द झाला होता, त्यानंतर BCCI ने ही घोषणा केली. (IPL 2025 Suspended)

“आयपीएलचा 18 वा मोसम एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्पॉन्सर, फ्रँचायझी आणि ब्रॉडकास्टर्ससोबत चर्चा करून नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल,” अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे.

IPL 2025 Suspended | IPL 2025 मध्ये आतापर्यंत काय झाले? :

57 सामने यशस्वीपणे पार पडले
8 मे रोजीचा सामना रद्द
एकूण 16 सामने शिल्लक
अंतिम टप्प्याचे सामने स्थगित
नवीन वेळापत्रक लवकरच

केवळ IPL नाही, तर पाकिस्तानमधील PSL (Pakistan Super League) स्पर्धाही तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तानमधील या परिस्थितीची आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे.

News Title : IPL 2025 Suspended Due to Indo-Pak Tension: 16 Matches Postponed, BCCI to Announce New Schedule

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .