IPL 2025 | आयपीएल 2025 मध्ये 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryawanshi) 35 चेंडूत शतक ठोकून सर्वांची मने जिंकली आहेत. मात्र, त्याच्या मेहनतीच्या तुलनेत मिळालेल्या मानधनामुळे आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) महाकाय रकमेवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ( IPL 2025)
वैभव सूर्यवंशीची कडक खेळी
28 एप्रिल रोजी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघातील सामन्यात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryawanshi) अविस्मरणीय कामगिरी केली. गुजरातने प्रथम फलंदाजी करत राजस्थानसमोर 210 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, राजस्थानच्या सलामीवीर यशस्वी जैस्वालसह वैभवने तडाखेबंद सुरुवात करत लक्ष्य सहज पार केले.
यशस्वीने 40 चेंडूंमध्ये 70 धावा केल्या, तर 14 वर्षांच्या वैभवने अवघ्या 35 चेंडूत आपले शतक साजरे करत 38 चेंडूंत 101 धावा केल्या. या जबरदस्त खेळीत त्याने 11 षटकार आणि 7 चौकारांची आतषबाजी केली. जगभरातील क्रिकेट प्रेमींनी वैभवच्या या तुफानी खेळीचं जोरदार कौतुक केलं आहे.
विराट कोहलीवर संताप
वैभवच्या अद्वितीय खेळीच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीवर (Virat Kohli) नेटकऱ्यांचा संताप उसळला आहे. केवळ 1 कोटी रुपयांच्या करारात खेळणाऱ्या वैभवने धमाकेदार कामगिरी केली, तर दुसरीकडे बंगळुरू संघाने विराटसाठी 21 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र विराटच्या कामगिरीत अपेक्षित चमक दिसली नसल्याने सोशल मीडियावर याला अन्यायकारक म्हणत टीका होत आहे. अनेक चाहत्यांनी तरुण आणि नवोदित खेळाडूंना जास्त संधी व योग्य मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सच्या आगामी सामन्यांतही वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा वाढली आहे. सध्या देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याच्या अप्रतिम प्रदर्शनाचं कौतुक होताना दिसत आहे.
Title: IPL 2025 Vaibhav Suryawanshi’s 35-Ball Century, Virat Faces Backlash