बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPl Auction 2022: आयपीएल लिलावात कोणत्या संघानं मारली बाजी, माजी क्रिकेटपटू म्हणतात…

मुंबई | आयपीएलच्या नवीन सीझनसाठीचा मेगा ऑक्शन बंगळुरु येथे पार पडला. 10 संघानी आपले खिसे रिकामे करत खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावत आपले संघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

आयपीएल लिलावात कोणत्या संघानं बाजी मारली असं विचारलं असता माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी इतरांपेक्षा खूप वेगळं मत व्यक्त केलं. सीएसकेनं पुन्हा एकदा सर्वांना चितपट केलं. आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघानं बाजी मारली असल्याचं आकाश चोप्रा यांनी म्हटलं आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अनुभव आणि युवा अशा दोन्ही पातळीवर उत्तम गुंतवणूक करत सर्वोत्तम खेळाडू संघात दाखल करून घेतलं असल्याचं आकाश चोप्रा यांनी म्हटलं.

आकाश चोप्रा यांनी चेन्नई संघाला 10 पैकी 9 गुण दिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघात दाखल केलेल्या खेळाडूंबाबत आकाश चोप्रा खूप प्रभावीत झाले आहेत. यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

दरम्यान, लिलावाच्या पहिल्या दिवशी चेन्नई सुपरकिंग्ज संघानं काही मोठ्या खेळाडूंना संघात दाखल करून घेतलं. दुसऱ्या दिवशी काही छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या बोली लावत चेन्नईनं आपला संघ बांधला. महेंद्रसिंग धोनी, दीपक चहर, मोइन अली, रविंद्र जडेजा, अंबाती रायडू, ऋतूराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, शिवम दुबे, रॉबिन उथप्पा, तुषार देशपांडे, केएम आसिफ, राजवर्धन हंगारेकर, सिमरजीत सिंह, ड्वेन कॉनवे, ड्वेन प्रिटारियस, मिचेल सॅटनर, एडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीशन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा आणि माहीश तीक्ष्णा, या खेळांडूचा समावेश चेन्नई सुपर किंग्ज संघात झाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

कुडाळ परिसरात शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये धक्काबुक्की, पोलीस घटनास्थळी दाखल

पुष्पाचा जलवा कायम! आता साड्यांमध्येही पहायला मिळणार ‘पुष्पा’ची क्रेझ

मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजेंची मोठी घोषणा, म्हणाले…

“नाना पटोले वगैरे नौटंकीबाज लोकं आहेत, त्यांनी कितीही…”

Gold Price Today: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More