Top News खेळ

पैशांचा मिटर तुटला… युवराज सिंगला लागलेल्या बोलीचा रेकॉर्ड ‘या’ खेळाडूनं तोडला!

Photo- Facebook/RCB

चेन्नई | चेन्नई येथे सुरु असलेल्या आयपीएलच्या लिलावाकडे साऱ्या क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलं आहे. ग्लेन मॅक्सवेलसारख्या आयपीएलमध्ये फारसा करिश्मा न दाखवणाऱ्या खेळाडूवर 14.25 लाख रुपयांची बोली लावल्यानं सारे हैराण झाले होते, त्यानंतर आणखी एका धक्कादायक बोलीची नोंद झाली आहे. ख्रिस मॉरिसवर ही बोली लावण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं आहे. त्याला लावलेली बोलीची रक्कम ऐकली तर तुम्ही थक्क व्हाल, त्याला तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली आहे.

आयपीएलच्या इतिहासात भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग सर्वात महागडा खेळाडू मानला जात होता. 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला 16 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र ख्रिस मॉरिसने त्याचाही रेकॉर्ड तोडला आहे.

33 वर्षीय ख्रिस मॉरिस 2013 पासून आयपीएलचे सामने खेळत आहेत. आयपीएलच्या 70 सामन्यांमध्ये त्याने 551 धावा केल्या आहेत, तर 80 बळीही घेतले आहेत. अष्टपैलू कामगिरी असल्याने त्याला आपल्या संघात खेचण्यासाठी आयपीएलच्या या लिलावात चांगलीच चढाओढ पहायला मिळाली.

थोडक्यात बातम्या-

गजानन मारणेला आणखी मोठा धक्का, पोलिसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

बबब… छप्पर फाडके पैसा!!! ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूला लागली जबरदस्त बोली

‘ते’ ट्विट करणं राहुल गांधींच्या अंगलट, ‘या’ वक्तव्यामुळं अडचणीत!

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडतंय असं, ‘या’ महिलेला दिली जाणार फाशी!

पूजाला होता ‘हा’ आजार, आई-वडिलांनी दिली महत्त्वाची माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या