बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या संकटामुळे आयपीएल तूर्तास रद्द, पुढील सामन्यांवर नंतर होणार निर्णय!

मुंबई | काही दिवसांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना त्यावेळी रद्द करण्यात आला. त्यानंतर आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव होत गेला.

हैदराबाद संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाचं लोन वाढतच चालल्याचं गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने तूर्तास रद्द करण्यात आले असून पुढील सामन्यांवर लवकरच निर्णय होणार असल्याचं बीसीसीआयकडून राजीव शुक्लांसह सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. सामने तात्पुरत्या स्वरूपात रद्द केले असले तरी नंतर आयपीएलवर नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हैदराबाद संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आयपीएलचे सामने होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र यावर बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सुरू असलेल्या आयपीएलचं पर्व सध्या तरी इथे थांबवण्यात येत आहे. परंतु पुन्हा हे सामने कधी घेतले जातील याच्याबद्दल सध्या निर्णय घेण्यात आलेला नाही. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असताना पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतानाच अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएल सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. त्यानंतर आता आयपीएलमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आयपीएलचे या सिझनचे सामने थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या –

नाशिकमध्ये छातीत दुखून अचानक होणाऱ्या मृत्यूंबाबत संभ्रम कायम 2 दिवसांत चक्क 5 जणांचा मृत्यू 

“मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाही, सगळंच रामभरोसे”

धक्कादायक! कोरोनाबाधित वृद्ध जोडप्याची ‘या’ कारणामूळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

विवाहीत प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दोघांना विजेच्या खांबाला बांधलं अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More