बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमच्याशी असं वागण्याची तुमची हिंमत कशी झाली?’; आयपीएल समालोचकाचा पंतप्रधानांना सवाल

मुंबई |देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलसाठी आलेले विदेशी खेळाडू अडकून पडले आहेत. त्यामुळे आता मायदेशी जाण्याच्या विचारात आहेत.

यामध्ये ऑस्ट्रेलियन सरकारनेही आयपीएलशी संबंधित ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वतःची व्यवस्था करावी लागेल, असे सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणारी विमाने 15 मेपर्यंत रद्द केली आहेत. त्यामुळे लीगमधील खेळणाऱ्या खेळाडूंना आणि समालोचकांना परतीचा मार्ग बंद झाला आहे. या निर्णयावरून ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकेल स्लेटर यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

जर सरकारने ऑस्ट्रेलियन लोकांच्या सुरक्षेची काळजी घेतली, तर ते आम्हाला घरी येऊ देतील. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. पंतप्रधान तुमच्या हाताला रक्त लागले आहे आमच्याशी असे वागण्याची तुमची हिंमत कशी झाली?, आपण क्वारंटाइन सिस्टिमविषयी काय बोलाल?, मी सरकारकडून आयपीएलमध्ये काम करण्याची परवानगी घेतली होती, पण आता सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं मायकेल स्लेटर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आयपीएल खेळणारे खेळाडू आणि समालोचक सर्व बायोबबलमध्ये आहेत. मात्र बायोबबलमध्ये असतानाही कोलकाता नाइट राइडर्स संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरूमधील सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला…’; अदर पुनावाला यांनी दिलं स्पष्टीकरण

मराठी चित्रपटसृष्टीला धक्का! फर्जंद, फत्तेशिकस्तमधील कलाकाराचा कोरोनामुळे मृत्यू

‘ …तर CT-SCAN करू नका’, एम्सच्या संचालकांनी दिला महत्वाचा सल्ला

“टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याची ताकद ठेवा”

परमबीर सिंग यांच्या अडचणीत पुन्हा वाढ; क्रिकेट बुकिकडून ‘इतके’ कोटी रूपये उकळल्याचा आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More