बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डिविलिअर्सच्या झंझावातापुढे मुंबई निष्प्रभ, अटीतटीच्या सामन्यात RCBचा विजय

चेन्नई | अत्यंत अटीतटीच्या झालेल्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माच्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने धक्कादायक पराभव केला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोण विजयी होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र पहिल्याच सामन्यात बंगळुरुने मुंबईवर मात केलेली पहायला मिळाली. मुंबईने बंगळुरुला दिलेले १६० धावांचे आव्हान बंगळुरुने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले.

विराट कोहलीने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. रोहित शर्मा आणि ख्रिस लीन जोडीने सुरुवात तर चांगली केली, मात्र दोघांमध्ये चांगला ताळमेळ नसल्यानं रोहितला १५ चेंडूत १९ धावा करुन धावबाद व्हावं लागलं. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या साथीने ख्रिस लीनने डाव सावरला. मुंबई इंडियन्सचं शतक धावफलकावर झळकेल असं वाटत असतानाच जेमीसननं सूर्यकुमारला बाद करत ही जोडी फोडली, त्यानं २३ चेंडूत ३१ धावा केल्या. त्यानंतर अर्धशतकापासून एक धाव दूर असलेला ख्रिस लीनही बाद झाला, त्याने ३५ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या.

ठराविक अंतराने मुंबईच्या विकेट्स पडत राहिल्या. शेवटच्या षटकात तर कहरच झाला. हर्षल पटेलच्या या षटकात मुंबईला फक्त १ धाव काढता आली तर या षटकात मुंबईचे चार खेळाडू बाद झाले. आरसीबीकडून हर्षल पटेलनं सर्वाधित ५ विकेट्स घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदर आणि जेमीसनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या आरसीबीची टीम सुरुवातीलाच लकी ठरली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्मानं वॉशिंग्टन सुंदरचा सोपा झेल सोडला, मात्र वॉशिंग्टनला त्यानंतर फार किमया दाखवता आली नाही तो १६ चेंडूत १० धावा करुन बाद झाला. त्यानंतर आलेल्या रजत पाटीदारलाही खास करामत दाखवता आली नाही, ८ चेंडूत ८ धावा करुन तो बाद झाला.

रजतनंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं मात्र मुंबईच्या गोलंदाजांच्या तोडचं पाणी पळवलं. त्याने २८ चेंडूत ३९ धावांची तडाखेबाज खेळी केली. त्याआधी २९ चेंडूत ३३ धावा काढून विराट कोहली बाद झाला होता. कोहली-मॅक्सवेल एकापाठोपाठ एक बाद झाल्यानं आरसीबीची सारी जबाबदारी एबी डिविलिअर्सच्या खांद्यावर आली होती, मात्र ३ चेंडूत ३ धावांची गरज असताना तो दुसरी धाव काढण्याच्या नादात धावबाद झाला. डिविलिअर्सने २७ चेंडूत ४८ धावा केल्या. त्यानंतर बंगळुरुला २ चेंडूत २ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात फक्त दोनच विकेट होत्या. मात्र मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलने कोणतीही चूक केली नाही, दोघांनी दोन्ही चेंडूंवर प्रत्येकी एक धाव काढत आरसीबीला विजय मिळवून दिला.

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ चेंडूनं केला विराट कोहलीचा घात, उजवा डोळाच केला लाल!

बंगळुरुच्या ‘या’ खेळाडूनं मोडली मुंबईची कंबर, निम्मी टीम पाठवली माघारी!

…म्हणून मुंबई इंडियन्सचे समर्थक म्हणतात, पहिली मॅच आम्हाला हरायचीय!

अजित पवारांचं बोलणं टग्यासारखं अन् रडणं बाईसारखं- गोपिचंद पडळकर

एवढी कुठं ताकद असते का राव?, ‘या’ खेळाडूनं शॉट मारताच बॅटचे दोन तुकडे, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More