बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तो आला, त्यानं पाहिलं… अन् चौकार-षटकार मारुन पुन्हा जिंकून दिलं!

नवी दिल्ली | आयपीएल 2021चा पहिला प्ले-ऑफ सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी पार पडला. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन अव्वल टिममध्ये हा क्वालिफायर सामना रंगला होता. चेन्नई सुपर किंग्जने 4 विकेट्सने दमदार विजय मिळवला. क्वालिफायर सामना खिशात घालत चेन्नईनं नवव्यांदा फायनल्समध्ये प्रवेश केला आहे. यात सगळ्यात जास्त कौतुक होत आहे ते कॅप्टन कूल धोनीचं.

दिल्ली संघानं 173 धावांचा डोंगर चेन्नईसमोर रचला होता. चेन्नईला विजयासाठी 11 चेंडूत 24 धावांची गरज होती. चेन्नईच्या विजयावर सर्वांनाच शंका वाटत असताना शेवटच्या षटकात कॅप्टन कूल धोनी मैदानात उतरला. तो आला, त्यानं पाहिलं आणि चौकार षटकार मारत त्याच्या स्टाईलमध्ये चेन्नई संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

ग्रेट फिनीशर अशी धोनीची ओळख आहे. धोनीने 19व्या षटकात 3 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 18 रन्स काढले. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती. त्यावेळी धोनीने एक चौकार मारला आणि अंतिम सामन्याचे दरवाजे चेन्नईसाठी खुले केले. धोनीच्या खेळीवर त्याचे चाहते आणि क्रिकेट प्रेमी कौतुकाचा वर्षाव करत आहे.

चेन्नईकडून खेळताना डू प्लेसिस 1 धावावरच बाद झाला. पण ऋतुराज आणि उथप्पाने दमदार खेळी करत शतकी भागीदारी केली. उथप्पा पाठोपाठ श्रेयस अय्यरला देखील मैदानात परतावे लागले. पण त्यानंतर मोईनने ऋतुराजला साथ दिली. ऋतुराज 70 धावांची शानदार खेळी करत बाद झाला. त्यानंतर फिनीशर धोनी मैदानात उतरला आणि त्याच्या स्टाईलने चेन्नईला विजय मिळवून दिला.

 

थोडक्यात बातम्या-

‘गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या’; नवाब मलिकांनी घेतला आक्रमक पवित्रा

“केवळ आश्वासनाचे डोंगर उभा करून ठेवलेत, मदत म्हणून फुटकी कवडी सुद्धा दिली नाही”

‘आधुनिक महिलांना नको असतं मुल’; भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळं

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

“अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठा नको, अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसी नको”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More