Top News खेळ

पुढच्या वर्षीच्या IPL मध्ये मोठे बदल, 10 संघांसोबत अशी रंगणार स्पर्धा!

नवी दिल्ली | आगामी आयपीएलमध्ये दोन टीम वाढवण्यात येणार असल्याची चिन्ह दिसतायत. यासंदर्भात डिसेंबरमध्ये बैठक होणार असून जर टीम वाढल्या तर एकूण 10 टीम आयपीएलमध्ये खेळतील.

दरम्यान आयपीएलमध्ये 10 टीम कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. तर 2011 साली वापरण्यात आलेला आयपीएलचा फॉरमॅट आगामी वर्षीही वापरला जाणार आहे. ज्यामध्ये 10 टीम दोन ग्रुपमध्ये विभागल्या जातील.

या 2 ग्रुपपैकी एका ग्रुपमधल्या 5 टीम एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. तर दुसऱ्या ग्रुपमधल्या टीमशी एकच सामना खेळतील. ग्रुपमधल्या टीम ठरवण्यासाठी यापूर्वी लॉटरीचा वापर केला होता.

आयपीएलच्या नव्या टीमसंदर्भात अहमदाबाद, पुणे आणि लखनऊ ही नावं चर्चेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश, मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची मोठी माहितीु

गांजा ड्रग्ज नव्हे तर औषध; भारतासह 27 देशांचं समर्थन, पाकिस्तानचा मात्र विरोध!

“फक्त नवरदेवाने लग्नाची घाई करुन होत नाही, घरच्यांनीही मनावर घेतलं पाहिजे”

“अमर, अकबर, अँथनी’ हिट!; रॉबर्ट सेठ हरला”

शेतकरी आंदोलनामुळे भाजपला मोठा झटका, ‘या’ राज्यातील सत्ता जाणार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या