खेळ

“यूएई सुरक्षित नाही, IPL 2020 भारतातच खेळवा”

नवी दिल्ली | आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगचा मार्ग मोकळा झाला. यूएई क्रिकेट बोर्डानेही आयपीएल लीग खेळण्यासाठी तयारी दर्शवली. आता फक्त केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे आणि रविवारी होणाऱ्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत त्याबाबतची घोषणा करण्यात येईल. मात्र यूएई सुरक्षित नाही, त्यामुळे आयपीएल भारतातच खेळवा, अशी मागणी आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे करण्यात आलीये.

आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणासंदर्भात याचिका दाखल करणारे आदित्य वर्मा यांनी ही मागणी केलीये. आदित्या वर्मा यांच्या सांगण्यानुसार,”दुबईमध्ये रग्बी सेव्हन ही मोठी स्पर्धा होणार होती. मात्र कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटामुळे ही स्पर्धा नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलीये. मग आयपीएल यूएईमध्ये का खेळवण्यात येतेय? याचसंदर्भात बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांना यासंदर्भात पत्र लिहिलं. शिवाय आयपीएल भारतातच खेळवण्याची विनंती त्यांना केलीये आहे.”

आदित्या वर्मा यांनी आयपीएल मुंबईत खेळवण्याची मागणी केलीये. “मुंबईत बायो सिक्युर बबल तयार केलं जाऊ शकतं. यूएईच्या तीन वेगवेगळ्या स्टेडियमवर सामने खेळवण्यापेक्षा मुंबईत खेळवणं सोयीचं ठरेल,” असंही ते म्हणालेत.

परदेशी खेळाडूंना दुबईत दाखल होणं, मुंबईच्या तुलनेत सोयीचं आहे. त्यावर वर्मा यांनी सांगितलं की,”आयपीएलमध्ये 60 पेक्षा अधिक परदेशी खेळाडू खेळणार आहेत. जर त्यांची मुंबईत येण्याची तयारी नसेल, तर त्यांच्याजागी भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी देण्यात यावी.”

महत्वाच्या बातम्या-

…अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येऊन धडकेन; राधाकृष्ण विखेंचा सरकारला इशारा

मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी FIR का नाही नोंदवला?- सुब्रमण्यम स्वामी

‘पुराव्यांशी छेडछाड होऊ नये, या प्रकरणात लक्ष द्या’; सुशांतच्या बहिणीचं पंतप्रधान मोदींना आवाहन

‘मुंबई पोलिस सक्षम…’ सुशांत सिंगच्या आत्महत्येचं राजकारण करणाऱ्यांना रोहित पवारांनी खडसावलं!

राजस्थानमधील तमाशा पंतप्रधान मोदींनी बंद करावा- अशोक गेहलोत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या