बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे नाही तर आयपीएलमुळे सामना रद्द???; इंग्लंड क्रिकेट बोर्डाचं सुचक वक्तव्य

मुंबई | भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5व्या कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करावा लागला आहे. सामना रद्द झाल्याची माहिती आयसीसीने दिली होती. भारत मालिकेत 2-1ने आघाडीवर असून देखील भारताला मालिका विजेता घोषित केलं नाही. त्यानंतर आता गेल्या 8 तासापासून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय.

भारताचे असिस्टंट फिजिओ योगेश परमार यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे भारतीय संघात भीतीचं वातावरण होतं. त्यावर बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डात चर्चा झाली. टाॅसपूर्वी भारतीय संघ सामन्यासाठी तयार नसल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ टाॅम हॅरिसन यांनी एक वक्तव्य केलं आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना कोरोनाच्या भीतीमुळे नाही तर, ‘काय होऊ शकतं’ हा विचार करून रद्द केला गेला, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ टाॅम हॅरिसन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगली. भारत इंग्लंड यांच्यातील सामना पुढे ढकलला तर आयपीएलला मोठा फटका बसू शकतो, असं सुचक वक्तव्य टाॅम हॅरिसन यांनी केल्याचं वृत्त इंग्लंडमधील माध्यमांनी दिलं आहे.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील सिरीज आता संपली आहे. आता उर्वरित सामना जरी खेळवला गेला, तरी सामना हा मालिकेचा भाग असणार नाही, असंही टाॅम हॅरिसन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद कधी सुटतोय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.

थोडक्यात बातम्या-

अर्जुना तया नाव दान, जे का अंजनाचे निधान! दगडूशेठला तब्बल ‘इतक्या’ किलो सोन्याचा मुकूट अर्पण

“राज्यात भाजपचं सरकार यावं ही गणरायाची इच्छा, बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील”

काँग्रेसचं यापेक्षा करेक्ट वर्णन दुसरं असूच शकत नाही- देवेंद्र फडणवीस

इंग्लंडचा रडीचा डाव! भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात पुन्हा नवा ट्विस्ट

औषधांची ड्रोनद्वारे होम डिलव्हरी करणारं देशातील ठरणार ‘हे’ पहिले राज्य!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More