खेळ

19 तारखेपासून आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात; 971 खेळाडूंचा समावेश

मुंबई | ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या आगामी हंगामासाठी होणाऱ्या लिलाव प्रक्रियेला 19 डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. या लिलावात तब्बल 971 खेळाडूंचा समावेश आहे. यात 713 भारतीय तर 258 परदेशी खेळाडू आहेत.

येत्या आयपीएलचा लिलाव कोलकाता येथे होणार आहे. लिलावासाठी खेळाडूंची नोंदणी प्रक्रिया 30 नोव्हेंबरला संपली आहे. येत्या 9 डिसेंबर पर्यंत सर्व संघांना इच्छुक खेळाडूंची नावे देण्याची अंतिम तारीख दिली आहे.

सर्व संघाचा मिळून जवळपास 73 जागांसाठी लिलाव होणार आहे. यावर्षीं संघातील काही महत्वाचे खेळाडू बदलण्याची शक्यता आहे. त्यात महेंद्रसिंग धोनीचे नाव येण्याची शक्यता आहे. धोनी कोणत्या संघात जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

लिलावात सामिल होणाऱ्या अन्य देशाच्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक 55 खेळाडू आहेत. त्यापाठोपाठ श्रीलंका 39, न्यूझीलंड 23 आणि इंग्लंड 22 यांचा क्रमांक लागतो.

महत्वाच्या बातम्या –

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या