सर जडेजाने केला नवा विक्रम; हा पराक्रम आजपर्यंत कोणालाही करता आला नाही

IPL Ravindra Jadeja Completes 100 IPL Catches l काल KKR विरुद्ध CSK या दोन संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईच्या संघाने KKR ला पराभूत केले आहे. चेपॉकमध्ये सीएसकेचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने जबरदस्त गोलंदाजी केली आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाचा विजयरथ रोखला आहे. या सामन्यात CSK चा अष्टपैलू जडेजाने केवळ चमकदार गोलंदाजीच केली नाही तर क्षेत्ररक्षक म्हणूनही आपली छाप केली आहे. जडेजाने 4 ओव्हर्समध्ये 3 बळी घेऊन एक नवा विक्रम केला आहे.

रवींद्र जडेजाने आयपीएलमध्ये 100 झेल केले पूर्ण :

चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) स्टार अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये 100 झेल पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो पाचवा क्षेत्ररक्षक ठरला आहे. अशातच आता या विक्रमाने रवींद्र जडेजाने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये एक मोठा विक्रम देखील केला आहे. आयपीएलच्या इतिहासात 1000 पेक्षा जास्त धावा, 100 विकेट आणि 100 झेल घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट कोहलीचे नाव आघाडीवर आहे, त्याने आतापर्यंत एकूण 110 झेल घेतले आहेत. माजी अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने 109 झेल घेतले आणि तो दुसऱ्या स्थानावर आहे. किरॉन पोलार्डने 103 तर रोहित शर्माने 100 झेल घेतले आहेत.

IPL Ravindra Jadeja Completes 100 IPL Catches l केकेआरविरुद्ध रवींद्र जडेजाने घेतल्या तीन विकेट :

रवींद्र जडेजाने KKR विरुद्ध 4 षटके टाकली आणि फक्त 18 धावा देत 3 बळी घेतले आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट फक्त 4.50 होता. यादरम्यान जडेजाने 11 डॉट बॉल टाकले आहेत. त्याने सुनील नरेनला 27 धावांवर, अंगक्रिश रघुवंशीला 24 धावांवर आणि व्यंकटेश अय्यरला 3 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर आपला बळी बनवले आहे.

त्याच्या फिरणाऱ्या चेंडूसमोर केकेआरचे फलंदाज काहीही करू शकले नाहीत आणि झटपट बाद झाले. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने सीएसकेला 138 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात CSK ने 17.4 षटकात लक्ष्य गाठले आणि CSK ने 7 गडी राखून विजय मिळवला आहे.

News Title : IPL Ravindra Jadeja Completes 100 IPL Catches

महत्त्वाच्या बातम्या-

शिखर धवनची पलटण कमिन्सच्या शिलेदारांना रोखणार का?

गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल

या दोन राशींच्या लोकांना व्यवसायाला यश मिळेल

ऐश्वर्याचा घटस्फोट होणार!, 18 वर्षांचं नातं तोडण्यासाठी दोघे कोर्टात

घराणेशाहीत भाजपचा पहिला नंबर, दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर आहेत ‘हे’ पक्ष!