बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL Retention: कहीं खुशी कहीं गम, वाचा रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी

मुंबई | क्रिकेटमध्ये टी-20 फाॅरमॅट आल्यानंतर क्रिकेटचं रंगरूपचं बदललं. गेल्या 14 वर्षात भारतात आयपीएल खूप गाजली. भारतीयांनी आयपीएलला भरभरून प्रेम दिलं. क्रिकेटप्रेमींच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आयपीएलने देखील वेगवेगळ्या हंगामात नवनवीन बदल केले होते. आयपीएल 2022च्या तयारीने आता जोर पकडला आहे. कालपासून आयपीएल 2022च्या हंगामाला सुरूवात झाली आहे.

आयपीएल सामने पुन्हा रोमांचक होण्यासाठी आता संघात बदल करण्यात आले आहेत. फ्रेंचायझी त्यांच्या संघातील फक्त चार खेळाडूंना रिटेन करू शकतात. ज्यात तीन पेक्षा जास्त भारतीय आणि दोन पेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकत नाहीत, असा नियम आहे. अशातच कोणत्या संघाने कोणते खेळाडू रिटेन केलेत पाहुया…

Mumbai Indians –  रोहित शर्मा (16 कोटी), सुर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी)

Chennai Super Kings- ऋतुराज गायकवाड (6 कोटी), महेंद्रसिंह धोनी (12 कोटी), रवींद्र जडेजा (16 कोटी), मोईन अली (8 कोटी)

Royal Challengers Bangalore – विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी) ( बंगळुरूने केवळ 3 खेळाडूंना संघात ठेवलं आहे)

Delhi Capitals –पृथ्वी शॉ (7.50 कोटी), रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी),  अँनरिच नॉर्टीजिया (6.50 कोटी)

Kolkata Knight Riders – व्यंकटेश अय्यर (8 कोटी),  आंद्रे रसल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी)

Punjab Kings –  मयांक अग्रवाल (12 कोटी) आणि अशदिप सिंह (4 कोटी) ( पंजाबने कर्णधार के एल राहुलला सोडल्याने आता सर्वच संघ त्याच्यावर बोली लावण्याची शक्यता आहे.)

Sunrisers Hyderabad – केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल सामद (4 कोटी), उमरान मलिक (4 कोटी)

Rajasthan Royals – संजू सॅमसन (14 कोटी), जॉस बटलर (10 कोटी), यशस्वी जयस्वाल (4 कोटी)

दरम्यान, या सर्व खेळाडूंनी रिटेन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आता लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ आयपीएल 2022मध्ये दिसणार आहेत. त्यामुळे आता आयपीएल आणखीनंच रोमांचक होणार हे आता स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

“Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रसुद्धा…”, ममता बॅनर्जींना खात्री

“अयोद्धा-काशी जारी है, मथुरा की अब तैयारी है”

“भंगार Nawab Malik स्वतःला डिटेक्टीव्ह करमचंद समजायला लागलाय”

Omicron: ओमिक्रॉनवर लस कधी बनणार?, आली ‘ही’ माहिती समोर

‘काँग्रेस एकला चलो साठी सुद्धा तयार’; ‘या’ काँग्रेस खासदाराचं मोठ वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More