बिगुल वाजलं! आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; पाहा तुमच्या आवडत्या संघाचा सामना कधी होणार?
मुंबई | अवघ्या जगाचं लक्ष लागलेली बहूचर्चित आयपीएल स्पर्धेचा यंदाचा हंगाम 26 मार्च पासून मुंबईत सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिलाच सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि दोन वेळेचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. बीसीसीआयकडून स्पर्धेत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
आयपीएलमध्ये यावर्षी नव्यानं समावेश करण्यात आलेल्या दोन संघासह सर्वांना प्रत्येकी 14 सामने खेळायचे आहेत. मुंबई आणि पुण्यातील स्टेडियमवर हे समाने खेळवण्यात येणार आहेत. लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. तर प्लेऑफचे सामने हे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून आयपीएलनं आपलं नाव कमावलं आहे. महाराष्ट्रात आयपीएलचे सर्व सामने होणार असल्यानं राज्याच्या अर्थकारणाला गती मिळणार असल्याचं राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेनंतर लागलीच संघातील खेळाडू आयपीएलचा सराव सुरू करतील.
दरम्यान, आयपीएलचा शेवटचा लीग सामना 22 मे रोजी संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या संघामध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता सर्वांना मनोरंजक स्पर्धेचं वेध लागलं आहे.
पाहा ट्विट –
🚨 NEWS 🚨: The Board of Control for Cricket in India (BCCI) announced the schedule for #TATAIPL 2022 which will be held in Mumbai and Pune.
A total number of 70 league matches and 4 Playoff games will be played in the duration of 65 days.
More Details 🔽
— IndianPremierLeague (@IPL) March 6, 2022
थोडक्यात बातम्या –
“पुणे महापालिकेत येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान”
मोठी बातमी! एसटी महामंडळातील नोकरभरती बंद
“त्यावेळी सुशीलकुमार शिंदेंचं तिकिट कापलं अन् मला अश्रू अनावर झाले”
“पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर लवकरच संपणार”
“मुख्यमंत्र्यांनी पैसे खाल्ले म्हणून मुंबई पावसात बुडाली”
Comments are closed.