बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उर्वरित आयपीएलचा मुहूर्त ठरला, या तारखेपासून पुन्हा रंगणार आयपीएलचा थरार!

मुंबई | गेल्या तीन- चार महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभर हैदोस घातला होता. या लाटेत अनेकांनी आपले प्राण गमावले होते. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका जगातील प्रसिद्ध लीगलाही बसला होता. खेळाडू बायोबबल असतानाही इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. त्यामुळे स्पर्धा थांबवण्यात आली होती. सर्व क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला होता. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने बीसीसीआयने उर्वरित आयपीएल चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.

19 सप्टेंबरपासून आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यात येणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना हा 15 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये होणार आहे.

आयपीएल 2021 या स्पर्धेला 9 एप्रिलला सुरुवात झाली होती. मात्र एक-एक करत खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने आयपीएल थांबवण्यात आली होेती. चालू स्पर्धेतून परदेशी खेळाडूंनी घरी जाण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, कोरोना काळात भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी ऑक्सिजन आणि बेड न मिळाल्याने कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी पुढाकार घेत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पँट कमिन्सने 41 लाखांची मदत केली होती.

थोडक्यात बातम्या-

मुंबईकरांनी करून दाखवलं; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

“गाडी चालवत पंढरपुरला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्याही पाहाव्यात”

27 जुलैबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

भास्कर जाधवांना एवढा माज कसला?, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More