Top News खेळ

IPL चं वेळापत्रक जाहीर, या दोन संघांमध्ये रंगणार सलामीचा सामना

दुबई | आयपीएलचा 13 वा सीजन लवकरच सुरु होणार आहे. क्रिकेट चाहत्यांची अजून उत्सुकता आता वाढली आहे. तर आता क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी आहे.

तर आता 13 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या वेळापत्रकानुसार पहिला सामना हा मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा होणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता अजूनच शिगेला पोहोचली आहे.

13 व्या सीजनच्या तेराव्या वेळापत्रकानुसार, 24 मॅचेस दुबईत, 20 मॅचेस अबुधाबीमध्ये तर 12 मॅचेस शारजाहमध्ये होणार आहेत. बीसीसीआयने हे वेळापत्रक जारी केलं आहे. प्ले ऑफ आणि फायनल मॅचेसच्या वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आलेलं नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएलचा सीजन पुढे ढकलण्यात आला. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत दुबईमध्ये आयपीएलचा थरार रंगणार आहे. तर आता वेळापत्र जारी झालं असून येत्या 19 तारखेला मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज मॅच रंगणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘एकजूट होऊन कोरोनाशी लढूया’; ‘या’ भाजप नेत्याचं मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

खळबळजनक! दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची दिली धमकी

‘….मूँह काला कर चुके है’; मनसेचा संजय राऊतांना टोला

मुलापाठोपाठ आमदार सुमन पाटील यांनाही कोरोनाची लागण

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या