Top News खेळ

IPL2020- गतविजेत्या मुंबईचा पराभव करत चेन्नईची विजयी सलामी

दुबई | आयपीएलच्या 13 व्या सीजनला आजपासून सुरुवात झाली. या सीजनच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गतविजेच्या मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आहे. 5 विकेट्स राखत चेन्नईने मुंबईवर मात केली आहे.

नाणेफेक जिंकत चेन्नईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  मुंबईने चेन्नईपुढे 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना चेन्नईची सलामीची जोडी झटपट बाद झाली. मात्र अंबाती रायूडू आणि फाफ ड्यु प्लेसिसने डाव सावरत चेन्नईला विजयाचा पथावर आणलं. रायूडू आणि प्लेसिस या दोघांनीही अर्धशतकं झळाकावली आहेत.

रायडूने 48 चेंडूंमध्ये 71 रन्स केले तर प्लेसिसने 44 चेंडूंत 58 धावा ठोकल्या. तिसऱ्या विकेटसाठी दोघांनीही भक्कम भागिदारी करत चेन्नईला जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

तर प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने पहिल्याच चेंडूला चौकार मारला. मात्र त्यानंतर त्याला मोठी खेळी करता आली नाही. रोहित 12 रन्सवर बाद झाल्यानंतर क्वींटन डिकॉकने काही वेळ डाव सावरला पण 33 रन्सवर सॅम कुरनने त्याची विकेट घेतली. मुंबईकडून सौरभ तिवारीने सर्वाधिक 42 धावांची खेळी करत मुंबईला 160 रन्सच्या पार नेलं.

महत्वाच्या बातम्या-

30 सदस्यांना कोरोनाची लागण, संसदेचं पावसाळी अधिवेशन लवकर संपवलं जाण्याची शक्यता

आनंदाची बातमी! राज्यात आज 23 हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

रुग्णालयाचं बिल पाहून रुग्णाची हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

“मी महाराष्ट्रात सुरक्षित आहे, उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली”

सरदार तारासिंग यांच्या निधनाने एक सच्चा समाजसेवक हरपला- देवेंद्र फडणवीस

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या