बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

KKR ची टीम अडचणीत; ‘या’ खेळाडूंनी भारतीयांना उद्देशून केलेले जुने ट्विट्स व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावरील जुन्या प्रतिक्रियांमुळे इंग्लंड क्रिकेट संघात सुरु असलेल्या वादामुळे कोलकाता नाईट रायडर्स टीम देखील अडचणीत आली आहे. कोलकाताचा कर्णधार इयन मॉर्गन आणि हेड कोच ब्रँडन मॅकलम यांचे जुने ट्विट्स व्हायरल झाले आहेत. या दोघांनी भारतीयांना उद्देशून प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली होती.

इयन मॉर्गन आणि ब्रँडन मॅकलम यांनी भारतीयांच्या इंग्रजीची थट्टा करणारं ट्विट 2018 साली केलं होतं. या दोघांनी जाणीवपूर्वक सर हा शब्द वापरला होता, तसंच चुकीच्या इंग्रजीमध्ये ट्विट करत भारतीयांची मस्करी केली होती. त्याचे स्क्रीन शॉट्स आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मॉर्गनची चौकशी करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

‘या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यासाठी आमच्याकडे पुरेशी माहिती नाही. या विषयावर कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी योग्य प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे. मात्र नाईट रायर्डर्सच्या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही’, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी मैसूर यांनी माहिती दिली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या पर्वाचा उत्तररार्ध सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. सध्या केकेआरची टीम पॉईंट टेबलमध्ये 7व्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन याचं 11 वर्षांपूर्वीचं 1 ट्विट आता व्हायरल झाले आहे. त्यामुळे तो अडचणीत येण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा सर्वात यशस्वी फास्ट बॉलर असलेल्या अँडरसननं हे ट्विट फेब्रुवारी 2010 मध्ये केले होतं, असं सांगितल्या जात आहेत. यामध्ये त्याने स्टुअर्ट ब्रॉडनें लेस्बियन व्यक्तीसारखी हेअरकट केली आहे, असं म्हंटले होतं. ‘मी आज ब्रॉडीचा नवा हेअरकट पाहिला. मला याबाबत खात्री नाही, पण तो 15 वर्षांच्या लेस्बियनसारखा वाटत आहे’, असं ट्विट अँडरसनने केलं होतं. तर, रॉबिन्सन प्रकरणानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या जुन्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत, या सर्व पोस्ट्ची चौकशी केली जाणार असल्याची घोषणा इंग्लंड क्रिकेट बोर्डानं केली आहे.

 

Photo Credit – Twitter/Brendon McCullum

 

थोडक्यात बातम्या –

‘नवनीत राणा यांच्यावर लोकसभा सभापतींनी कारवाई करावी’; आनंदराव अडसूळ आक्रमक

नियती काळ बनून आली, एकाच कुटुंबातील 9 जणांचा करुण अंत, मालाड दुर्घटनेनं मुंबईच्या डोळ्यात पाणी!

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी!

‘…म्हणून मी कर भरला नाही’; कंगणाने कर न भरण्याचं दिलं ‘हे’ कारण

“अन्यायकारक कायद्याची सर्वाधिक झळ महाराष्ट्राला; राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्राचा डाव”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More