बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा’ आयपीओ बाजारात बुधवारी धडकणार; गुंणतवणुकदांरांंना मोठी संधी

मुंबई | शेअर बाजारात पैसे कमवण्याची मोठी संधी असते. मोठमोठे गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे कमवण्यासाठी आयपीओमध्ये गुंतवणुक करत असतात. यातूनच काही गुंतवणुकदार बाजारातले बिग बुल्ल बनतात. राकेश झुनझूनवाला यांच नाव सध्या शेअर बाजारात मोठ्या आदराने घेतलं जातं. त्यांना देखील शेअर बाजारातील बिग बुल्ल मानलं जातं. झुनझूनवाला यांच्या कंपनीचा आयपीओ आता बाजारात धडकणार आहे.

राकेश झुनझूनवाला हे ‘नजरा टेक्नोलाॅजी’ या आयटी कंपनीचे मालक आहेत. या नजरा टेक्नोलाॅजीचा आयपीओ 17 मार्चला म्हणजेच येत्या बुधवारी बाजारात धडकणार आहे. या आयपीओची किंंमत 1100 ते 1101 रूपये प्रति शेअर असणार आहे. या शेअर मधून बाजारातील गुंतवणूकदारांना चांगल्या कमाई अपेक्षा आहे.

नजरा टेक्नोलाॅजी ही कंपनी ऑनलाईन गेमिंगमधील अग्रणी कंपनी आहे. या कंपनीचा कंटेट पुर्णपणे भारतात तयार होतो. 2020 मध्ये कंपनीचे 4 कोटी अॅक्टीव युझर्स आहेत. 2020 मध्ये कंपनीच्या महसूल 247.51 कोटी रूपये इतका होता. तर या आयपीओ मधून 583 कोटी रूपये कंपनीला उभे करायचे आहेत.

दरम्यान, आयसीआयसीआय सेक्युरिटीज, आयआयएफएल सेक्युरिटीज, जेफरीज इंडिया, नोमुला फायनान्शियल ऑडव्हायझरी अँड सेक्युरिटीज या आयपीओ मध्ये लीड मॅनेजर आहेत. राकेश झुनझूनवाला यांची टायटन कंपनी मध्ये मोठी गुंतवणूक आहे. त्यात त्यांची 6850 कोटीची भागीदारी आहे.

थोडक्यात बातम्या-  

‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’; संजय राठोडांच्या मतदारसंघातील शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही”

इशान किशनचं धूमधडाक्यात पदार्पण, भारताचा इंग्लंडवर दमदार विजय

जखमी वाघिण जास्त घातक असते- ममता बॅनर्जी

आम्हाला आणखी पाच वर्षे द्या घुसखोरी पूर्णपणे संपवू- अमित शहा

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More