वादग्रस्त व्हीडिओ प्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटकेंना पहिला झटका!

बीड | दलित विरोधी वक्तव्य केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आयपीएस भाग्यश्री नवटके यांना पहिला झटका बसला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई मिररने हे वृत्त दिलं आहे.

अॅट्रॉसिटीची तक्रार घेऊन आलेल्या दलितांना आपण कशी मारहाण केली?, असं नवटके या व्हीडिओमध्ये सांगत असल्याचं दिसत आहे. बीडचे पोलीस अधीक्षक श्रीधर गोविंदराजन यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

नवटके यांच्याविरुद्ध सोमवारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी दिला आहे.

भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी बाबूराव पोटभरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मनोहर जोशींची निवृत्तीची मागणी; उद्धव ठाकरेंचा मात्र नकार

-हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार; योगी आदित्यनाथांचं आश्वासन

-नरेंद्र मोदींना टफ-फाईट; आमदार जितेंद्र आव्हाड बनले चहावाले!

-राज ठाकरेंचा हा व्हीडिओ पाहून तुमची छाती अभिमानानं फुलून येईन!

-राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली; उत्तर भारतीयांना त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन सुनावलं!