Top News पुणे महाराष्ट्र

…अन् ‘आयर्नमॅन’ कृष्णप्रकाश यांनाही अश्रू आवरता आले नाहीत, पाहा व्हिडीओ-

पिंपरी | पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयर्नमॅन किताब मिळवला आहे, मात्र एका तरुणीने ऐकवलेल्या कवितेनं त्यांच्या काळजालाही पाझर फुटला आणि त्यांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली.

पळशी, ता. माण, जि. सातारा येथील ऋतुजा शांतीलाल पाटील नावाची तरुणी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना भेटायला आली होती. तिने वडिलांच्या निधनानंतर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर झुळूक नावाचं पुस्तक लिहिलं आहे. याच पुस्तकातील ‘देवा घराचा बाबा’ ही कविता तीनं कृष्णप्रकाश यांना ऐकवली.

ऋतुजाची कविता ऐकताच कृष्णप्रकाश यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. उपस्थित पोलीस अधिकारी देखील यावेळी भावनिक झालेले पहायला मिळाले. कृष्णप्रकाश यांनी ऋतुजाला यावेळी बक्षिस देखील दिलं.

दरम्यान, कृष्णप्रकाश अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, आपल्या सडेतोड आणि रोखठोक बोलण्यासाठी ते ओळखले जातात, मात्र आज ऋतुजाच्या कवितेमुळे कृष्णप्रकाश यांच्यातील हळवा माणूस देखील पहायला मिळाला.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

मी गळा कापून घेणं पसंत करेन पण भाजपसमोर झुकणार नाही- ममता बॅनर्जी

“घरी बसून दुसऱ्याची मापं काढली तर लोक तुम्हाला कायमस्वरूपी घरी बसवतील”

“ए शंकरपाळ्या…” महाराष्ट्राला वेड लावणारं लहान मुलांचं भांडण व्हायरल

“तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव”

शरद पवारांचं ते वक्तव्य खरं की खोटं?; राज्यपालांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या