बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारने जबरदस्तीने घरी बसवलं म्हणत IPS अधिकाऱ्याने केलं असं काही की…

लखनऊ | 1992 बॅचचे आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना उत्तर प्रदेशच्या सरकारने निवृत्त केलं आहे. अमिताभ ठाकूर हे लखनऊच्या गोमती नगरामध्ये राहत असून त्यांना निवृत्त करण्यात आल्यानंतर त्यांच्या घराबाहेरील पाटीने सर्वांचं लक्ष बेधून घेतलं आहे.

अमिताभ ठाकूर यांच्या घराबाहेर त्यांच्या नावासोबत त्यांचं पद लिहिलेली एक पाटी आहे. या पाटीवर त्यांनी आपल्या नावाच्या खाली ‘जबरिया रिटायर्ड’ असं लिहून एक फोटो काढला आहे. हा फोटो सोशल मिडीयावर सुद्धा व्हायरल होत असून या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

नियमांचं पालन न करणं आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे आणि त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं आहे, असं म्हणत योगी सरकारने अमिताभ ठाकूर यांच्यासोबत 2005 च्या बॅचचे राकेश शंकर आणि 2006 च्या बॅचचे राजेश कृष्णा यांना जबरदस्तीने घरी धाडलं आहे.

दरम्यान, अनेकदा वादाच्या जाळ्यात अडकलेले अमिताभ ठाकूर यांच्यावर उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंर त्यांच्याकडे बेहिशोब संपत्ती असल्याची चर्चा देखील रंगली असून योगी सरकारच्या कारभरावर त्यांनी अनेकदा जाहीरपणे टीका केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! फुलांसारख्या दोन लेकींसह बापाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

भाजप आमदार गणेश नाईकांच्या नातवाला माळशेज घाटाजवळ मारहाण!

“नाव परमविरांसारखं आणखी अन संपत्ती हडपतो बकासुरासारखी”

संजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स

“जनताही वेळ येताच सगळा हिशेब चुकता करत असते हे कोणी विसरू नये”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More