जयपूर | पदोन्नती मिळाल्याने जयपूरचे आयपीएस अधिकारी राहुल प्रकाश यांनी आपला सन्मान करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची निवड केल्याची अभिमानास्पद बाब समोर आली आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्यांनी आपल्या वर्दीवर पदोन्नतीचे स्टार लावून घेतले आहेत.
पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येकांची आनंद साजरा करण्याची पद्धव वेगळी असते. आयुष्यातील हा महत्वाचा क्षण कुटुंबीयांसोबत किंवा मित्रांसोबत साजरा करण्याचा अनेकांचा कल असतो. मात्र, राहुल प्रकाश यांनी आपला सन्मान करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची निवड केली. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
पदोन्नती झाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्दीवर स्टार लावून घेण्याची सर्वसाधारण पद्धत असते. मात्र, राहुल प्रकाश यांनी वाहतूक नियंत्रण कक्षातील सफाई कर्मचाऱ्यांची यासाठी निवड केली. तसेच त्यांनी आपला आनंद कनिष्ठ कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला.
दरम्यान, राहुल प्रकाश यांची डीसीपी पदावरून पोलीस उपमहानिरीक्षकपदी (वाहतूक) निवड झाली आहे. राहुल प्रकाश यांचा सफाई कर्मचाऱ्यांसोबतचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ट्रेंडिग बातम्या-
पुणे पोलिसांनी ट्विटरवर उडवून दिलीय नुसती धमाल!
शरद पवारांचा स्वपक्षातील प्रस्थापितांना धक्का; दिली सामान्य कार्यकर्त्याला संधी
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ खडसेंना द्यायला शिवसेनेकडे आहे तरी काय?- चंद्रकांत पाटील – https://t.co/z4SKG471m2 @ChDadaPatil @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) January 3, 2020
फडणवीसांसोबतच्या चर्चेत नाथाभाऊंची नाराजी दूर?; एकनाथ खडसे म्हणाले… https://t.co/TfAjKoaxZh @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) January 3, 2020
पुणे पोलिसांनी ट्विटरवर उडवून दिलीय नुसती धमाल!- https://t.co/VutgsX2Ihy@PuneCityPolice @CMOMaharashtra @OfficeofUT @CPPuneCity @DGPMaharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) January 3, 2020
Comments are closed.