बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लेटरबाॅम्ब’ प्रकरणाला वेगळं वळण; “IPS रश्मी शुक्ला यांना देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती”- परमबीर सिंह

मुंबई |  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘लेटरबाॅम्ब’ हल्ला केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळुन निघालं आहे. या प्रकरणात शरद पवार यांनी आयुक्तांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.

परमबीर सिंह यांनी या प्रकरणात आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून मी केलेल्या आरोपात तथ्य असून मी कोणतेही खोटे आरोप केलेले नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.

रश्मी शुक्ला या गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त असताना त्यांनी पोलीस महासंचालकांना अनिल देशमुखांकडून होत असलेला भ्रष्टाचार सांगितला होता. पण, रश्मी शुक्ला यांनाच या प्रकरणात उलट सुनावलं गेलं. आणि अनिल देशमुख यांच्यावर तेव्हाही कारवाई करण्यात आली नव्हती. ऑगस्ट 2020 ला रश्मी शुक्ला या गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त होत्या, त्यांनीही पोलीस महासंचालकांना एक अहवाल दिला होता. ज्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख हे अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केला होता.  या प्रकरणाचा संपूर्ण उल्लेख परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आलेलं पत्र लिहिल्यानंतर परमबीर सिंह यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच या प्रकरणातील पुरावे नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे, लवकरात लवकर तपास पूर्ण होणेही आवश्यक असल्याचं सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; कंगणा रनौतचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मान

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

महाराष्ट्रातील लाॅकडाऊनचा येत्या 2 दिवसात निर्णय होणार; राजेश टोपेंचं मोठं स्पष्टीकरण!

“काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही”

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर पुण्याच्या महापौरांचा ‘हा’ मोठा निर्णय

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More