‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कामसूत्र पुस्तकाची पवित्र आवृत्ती आणणार’

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता मनुस्मृतीप्रमाणे कामसूत्र पुस्तकाची नवी आवृत्ती घेऊन येणार असल्याचं मी ऐकलंय. काऊमसूत्र असं या पुस्तकाचं नाव असेल असं ट्विट माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटमुळे त्यांना रोषाचा सामना करावा लागतोय, तर काहीजण मज्जाही घेत आहेत. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कथित गोरक्षकांचा मुद्दा देशभरात गाजतो आहे. त्यावर बोट ठेवत संजीव भट्ट यांनी हे ट्विट केलंय. मात्र यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. 

Sanjiv Bhatt - ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कामसूत्र पुस्तकाची पवित्र आवृत्ती आणणार’

थोडक्यात बातम्यांसाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या