Top News पुणे महाराष्ट्र

‘मन में है विश्वास’नंतर ‘कर हर मैदान फतेह’; आयपीएस विश्वास नांगरे पाटील नव्यानं भेटणार!

पुणे | मन मे है विश्वास! या आयपीएस विश्वास नांगरे पाटलांच्या आत्मकथेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्यांचं आणखी एक आत्मकथन लवकरच प्रकाशित होणार आहे. कर हर मैदान फतेह, असं या पुस्तकाचं नाव आहे.

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाचा आयपीएसपर्यंतचा प्रवास, त्याचा संघर्ष मन में है विश्वास या पुस्तकात सांगण्यात आला होता. आयपीएस होणं हा या पुस्तकाचा गोड शेवट होता, मात्र आता वाचकांना त्यापुढील विश्वास नांगरे पाटील नव्या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.

कुंभार मातीला आकार देतो तसं आयपीएस झाल्यानंतर एका युवकाचे एका अधिकाऱ्यामध्ये होणारे रुपांतर नव्या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसनं हे पुस्तक बाजारात आणलं आहे.

पुस्तकासाठी आगाऊ नोंदणी सुरु करण्यात आली आहे. २६ जानेवारीपासून हे पुस्तक बाजारात उपलब्ध होईल, असं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

वाह अजित दादा वाह, लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा- निलेश राणे

शीतल आमटेंच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर!

शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

‘एका वर्षात दोनदा सुतक लागणं हे हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही’; शिवसेनेचा भाजपला टोला

‘सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर…; या काँग्रेस नेत्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या