महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

मोदी आणि फडणवीस तुम्ही शेतकरी आत्महत्येवर का बरं बोलत नाही; राहुल गांधींचा सवाल

मुंबई |  पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस तुम्ही शेतकरी आत्महत्येवर का बरं बोलत नाही, असा सवाल काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत एका सभेत बोलत होते.

मोदीजी, फडणवीसजी जरा बेरोजगारीबद्दल दोन शब्द तरी बोला, उद्योग बंद होत आहेत त्याबद्दल बोला, शेतकरी आत्महत्येबद्दल दोन शब्द तरी बोला.. मात्र ते याबाबत बोलणार नाहीत आणि ते जाणून बुजून बोलणार नाही कारण त्यांना माहितीये आपण या प्रश्नांची उत्तरच शोधली नाहीत, असं राहुल म्हणाले.

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून मोदींना लक्ष्य करत त्यांनी निदान ‘पीएमसी’ बँकेबाबत तरी बोलावं, असं आवाहन देखील राहुल यांनी  केलं. त्या बँकेचे संचालक कोण होते? कोणाचे नातेवाईक होते? किती जणांचे नुकसान झाले? किती जणांना पैसा दिला गेला? यावर त्यांनी बोलावं, असं राहुल म्हणाले.

दरम्यान, देशभरातील कोट्यावधी युवक बेरोजगार आहेत. मात्र पंतप्रधान चीनच्या राष्ट्रध्यक्षांबरोबर चहा पिण्यात मश्गूल आहेत, अशी टीका त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या