संयम पाहू नका, पाकिस्तानमध्ये घुसून मारु; ‘इराण’ची पाकला धमकी

नवी दिल्ली | दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने पाकिस्तानात घुसून दहशवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. आता इराणनेही अशाच प्रकारची धमकी पाकिस्तानला दिली आहे.

पाकिस्तान हा सीमावर्ती भागातील देशांमध्ये अशांतता पसरवत आहे. त्यामुळे इराणचा संयम पाहू नका, असा इशारा इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला दिला आहे.

दहशतवाद्यांना खतपाणी घालणे बंद करा नाहीतर पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना धडा शिकवण्यात येईल, अशी धमकी कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तानला दिली आहे.

दरम्यान, इराण भारताप्रमाणे पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाला कंटाळला असून सीमेवर भिंत बांधण्याचा विचार करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुलं आता महाराजांची युद्धनीती शिकणार, ‘या’ विद्यापीठात “शिवाजी द मॅनेजमेंट” गुरू चा समावेश

-सुजय विखे पाटील भाजपप्रवेश करणार? राधाकृष्ण विखे पाटलांचं सूचक वक्तव्य

-मोदींच्या उपस्थितीत भाषण करणाऱ्या माकप नेत्याचं निलंबन

-खूप सहन केलं पण आता नाही; आता घरात घुसून मारणार- नरेंद्र मोदी

भाजप पुन्हा एकदा सत्तेत आलं तर देशात हुकूमशाही येईल- शरद पवार