दुःखद घटना; राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

Helicopter Crash l अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. एका धरणाच्या उद्घाटनासाठी ते अझरबैजानला गेले होते. परतत असताना ही धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा युद्धपातळीवर शोध घेण्यात आला आहे. आता शोधमोहिमेत हे हेलिकॉप्टर सापडले असून हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाल्याचे समोर आले आहे. मात्र या दरम्यान या अपघातात आता इब्राहिम रईसी यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे.

अपघात कधी आणि कसा झाला? :

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी खोडाफरिन धरणाच्या उद्घाटनासाठी अझरबैजानला गेले होते. यानंतर ते तेथून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या तबरीझ शहरात जाणार होते. दरम्यान, वाटेत हेलिकॉप्टर कोसळले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो डोंगराळ भाग आहे. तिथे प्रचंड प्रमाणात धुकं असल्याने समोरचे दृश्य दिसले नसल्याने हा अपघात घडला आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या ताफ्यात एकूण 3 हेलिकॉप्टर होते. दोन हेलिकॉप्टर सुखरूप पोहोचले, मात्र राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर कोसळले. अमेरिकेचे सिनेटर चक शूमर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांची गुप्तचर संस्थांशी चर्चा झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही कटाचा संशय किंवा त्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानेही या घटनेवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/i/status/1792393998469828751

Helicopter Crash l इराणचे कोणाशी वैर आहे? :

इराणचे इस्रायलशी कट्टर वैर आहे. दोघांमधील वैर 50 वर्षांहून अधिक जुने असले तरी अलीकडच्या काळात इस्रायलने गाझावरील हल्ल्यानंतर त्यांच्यातील कटुता वाढली आहे. गेल्या महिन्यातच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने बदला घेण्याचा इशारा दिला होता आणि प्रत्युत्तरही दिले होते. तेव्हापासून मध्यपूर्वेत नव्या युद्धाची भीती होती.

इराणच्या राज्यघटनेच्या कलम १३१ मध्ये असे म्हटले आहे की, अध्यक्षपदावर असताना किंवा कोणत्याही कारणास्तव त्यांना पदावरून हटवावे लागले, तर अशा परिस्थितीत उपराष्ट्रपती निवडणूक होईपर्यंत राष्ट्रपती होतील. नवीन अध्यक्षाची निवड ५० दिवसांच्या आत होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत रायसी यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर अध्यक्ष होऊ शकतात.

News Title – iran president ebrahim raisi helicopter crash

महत्त्वाच्या बातम्या

फोर्ड कंपनी बाजारात धुमाकूळ घालणार; नवीन SUV कारची एंट्री

महत्वाची बातमी! हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट

राज्यातील ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार! लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा कसा असणार?

आज या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता

मोदी सरकार पुन्हा आल्यास ‘हे’ शेअर्स बनणार रॉकेट; पैसे होणार डबल