उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘या’ ठिकाणांना द्या भेट; जाणून घ्या IRCTC चा खास ‘समर प्लॅन’

IRCTC March Tour Package | शिमला, मनाली या भागात पर्यटनासाठी अनेक लोक जात असतात. बर्फाच्या चादरीत या भागाचं सौंदर्य बघणं एक सुंदर अनुभव देऊन जातो. मात्र या भागात कोणत्या महिन्यात जायला हवं, कधी जायला हवं याचा फ्लॅन (IRCTC March Tour Package) आखणं आवश्यक असतं. कारण प्रत्येक ठिकाणची खासीयत ही काही ठराविक महिन्यातच दिसून येत असते. कारण या महिन्यात तेथे काही उत्सव असतात किंवा काही स्पेशल फुड फेस्टिवल असतात जे पर्यटकांचं आकर्षण बनतं.

आता उन्हाळ्याच्या सुट्टया लागणारच आहेत. जर तुम्हीही कुठे जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आयआरसीटीसीने तुमच्यासाठी असाचा एक खास प्लॅन आणला आहे. याचे टुर पॅकेज तुम्हाला नक्कीच आवडेल. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हीही जर शिमला-कुल्लू-मनाली सारख्या सुंदर ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात तर आयआरसीटीसीचा हा प्लॅन एकदा नक्कीचा बघून घ्या.

शिमला हा भाग दिल्ली, चंदीगड पासून जवळ असल्याने येथे पुर्ण वर्ष पर्यटकांची गर्दी असते. शॉर्ट ट्रिपसाठी शिमला एक चांगले डेस्टिनेशन आहे. तसेच मार्च महिन्यात कुल्लू-मनाली देखील एक चागला पर्याय ठरू शकतो. याच भागात पर्यटनासाठी आयआरसीटीसीने एक झक्कास आणि शानदार फ्लॅन आणला आहे. यामध्ये तुम्ही तीन जागांना भेट देऊ शकता.

पॅकेजबाबत माहिती जाणून घ्या

पॅकेजचा कालावधी- 7 किंवा 8 दिवस
ट्रॅवेल मोड- फ्लाइट
डेस्टिनेशन प्लेस- कुल्लु, मनाली आणि शिमला
कुठुन प्रवास करु शकता?- कोच्ची
कधी जाऊ शकता ?- 1 मार्च 2024

IRCTC March Tour Package मध्ये काय सुविधा मिळणार?

थाबण्यासाठी हॉटेलची सुविधा
प्रवासासाठी फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासची सुविधा
ट्रिपमध्ये ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण मिळणार

IRCTC March Tour Package चे दर कसे असणार?

जर तुम्ही या ट्रीपमध्ये एकटे प्रवास करणार असाल तर तुम्हाला 66,060 रुपये द्यावे लागतील.
जर तुम्ही दोन व्यक्तीसोबत प्रवास करणार असाल तर तुम्हाला 52, 030 रुपये भरावे लागतील.
हाच प्लॅन तीन व्यक्तीसाठी थोडा वेगळा असणार आहे. जर तुम्ही तीन व्यक्ती असाल तर तुम्हाला प्रवासासाठी 49,360 रुपय भरावे लागतील.

या प्लॅनमध्ये तुम्हाला आपल्या मुलांसाठी वेगळे शुल्क भरावे लागणार आहेत. बेडसोबत (5-11 वर्ष) 44,980 तर बिना बेडसोबत हेच शुल्क 42, 360 इतके असेल.

‘अशी’ करा बुकिंग

तुम्ही या प्रवासाची बुकिंग आयआरसीटीसीच्या ऑफिशीयल वेबसाईटवर जाऊन करू शकता. किंवा आयआरसीटीसीच्या पर्यटक केंद्रात जाऊनही यासाठी बुकिंग करू शकता.

News Title-  IRCTC March Tour Package
महत्त्वाच्या बातम्या –

ऑफिसला या तरच पगार वाढेल नाही तर…; TCS ने कर्मचाऱ्यांसमोर ठेवली मोठी अट

Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…

“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका